मा.आ.दादासाहेब रोहमारे पतसंस्थेची चोख व्यवहारातून प्रगतीच्या दिशेने वाटचाल कौतुकास्पद : आ.आशुतोष काळे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मा.आ.दादासाहेब रोहमारे पतसंस्थेची चोख व्यवहारातून प्रगतीच्या दिशेने वाटचाल कौतुकास्पद : आ.आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी  :- मागील वर्षी आलेल्या कोरोना संकटामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे आर्थिक टंचाई निर्माण होवून प्रत्येक क्ष

संगमनेरच्या डॉ. खेडलेकरांनी ही सोडले साहित्य-संस्कृती सदस्यत्व
सनफार्मा आगीतील दोषींवर गुन्हे दाखल करा- मंत्री कड़ू
राज्यात दुष्काळ सदृश्य आणि मंत्री मात्र अदृश्य

कोपरगाव प्रतिनिधी  :- मागील वर्षी आलेल्या कोरोना संकटामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे आर्थिक टंचाई निर्माण होवून प्रत्येक क्षेत्र अडचणीत आले आहे. त्याचा फटका बँकिग क्षेत्राला देखील बसला असून त्याची झळ गावोगावी असलेल्या छोट्या-मोठ्या पतसंस्थांपर्यंत देखील पोहोचला आहे. मात्र अशा अडचणीच्या परिस्थितीत माजी आमदार श्री. दादासाहेब शहाजी रोहमारे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने या अडचणींवर मात करत चोख व्यवहारातून प्रगतीची धरलेली वाट कौतुकास्पद असल्याचे गौरवद्गार आ. आशुतोष काळे यानी काढले आहे.

पोहेगाव येथे माजी आमदार दादासाहेब शहाजी रोहमारे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा स्थलांतर व उदघाटन सोहळा नुकताच माजी आमदार अशोकरावजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली व साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडला याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील अनेक पतसंस्थांनी तातडीने कर्ज उपलब्ध करून देत गरजू नागरिकांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यात मोलाची कामगीरी बजावली आहे. कोरोना संकटातही या संस्थानी आपल्या चोख व्यवहारामुळे आपले आर्थिक संतुलन टिकवून ठेवले आहे. त्यापैकी श्री. दादासाहेब शहाजी रोहमारे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था असून या पतसंस्थेने आर्थिक संतुलनाबरोबरच ग्राहकांशी आपले वर्षानुवर्षाचे सबंध देखील जपले आहे. काळे परिवाराचे व रोहमारे परिवाराचे देखील अनेक वर्षापासूनचे ऋणानुबंध आहेत. माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेव व माजी आमदार दादासाहेब शहाजी रोहमारे यांची समाजिक विचारधारा एक होती. या विचारधारेतून माजी आमदार अशोकराव काळे यांनी देखील हे ऋणानुबंध जपले आणि यापुढे देखील हे ऋणानुबंध असेच राहणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, कोपरगाव एज्युएकेशन सोसायटीचे चेअरमन अशोकराव रोहमारे, श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त अविनाश दंडवते, संस्थेच्या चेअरमन क्रांतीताई रोहमारे, सोसायटीच्या चेअरमन श्रीमती शकुंतलाताई रोहमारे, जयंतराव रोहमारे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, संचालक सचिन रोहमारे, सुनील शिंदे, आनंदराव चव्हाण, सूर्यभान कोळपे, राजेंद्र घुमरे, काकासाहेब जावळे, संजय रामराव रोहमारे, सहकारी संस्था सहाय्यक निबंधक एन.जी. ठोंबळ, पंचायत समिती सदस्य अनिल कदम, रोहिदास होन, राहुल रोहमारे आदी मान्यवरांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक जयंतराव रोहमारे यांनी केले.उपस्थितांचे स्वागत कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक सचिन रोहमारे यांनी केले. सूत्रसंचालन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले तर आभार शुभम रोहमारे यांनी मानले.

COMMENTS