Homeताज्या बातम्या

पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते नुतन कार्डियाक रुग्णवाहिकेचे उद्घाटन

राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते आज बीड जिल्हा रुग्णालयातील नुतन कार्डियाक रुग्णवाहिकेचे उ

कार्यालयीन स्वच्छता, लोकाभिमुख प्रशासनावर भर; सीईओ महेश पाटील यांची विविध विभागांना भेट
कोट्यवधींचा आरोग्य निधी वाया, खाबूगिरीला लगाम; डॉ. संगीता देशमुख निलंबित
प्रसुतीवेळी नवजात बाळ जमिनीवर पडलेबाळावर उपचार सुरू ; कुटुंबियांची कारवाई करण्याची मागणी



राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते आज बीड जिल्हा रुग्णालयातील नुतन कार्डियाक रुग्णवाहिकेचे उद्घाटन करण्यात आले. बीड जिल्ह्यातील हृदयरोग रुग्णांना तात्काळ आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी ही रुग्णवाहिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. जिल्हा रुग्णालयात कार्डियाक रुग्णवाहिका आणि कॅथलॅबची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना उपचारासाठी इतर मोठ्या शहरामध्ये धाव घेण्याची गरज भासणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. डॉक्टर्स फॉर यु यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला प्रगत कार्डियाक रुग्णवाहिका भेट म्हणून मिळाली आहे.
या उद्घाटन सोहळ्यानंतर पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी बीड जिल्हा रुग्णालयातील नवनिर्मित कार्डियाक कॅथलॅब युनिटची पाहणी केली. तसेच रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा आढावा घेत त्यांनी रुग्णांना दर्जेदार उपचार देण्याबाबत प्रशासनाला आवश्यक सूचना केल्या.  यावेळी आमदार विजयसिंह पंडीत, आमदार विक्रम काळे, माजी आमदार संजय दौड, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान यांची प्रमुख उपस्थिती होती.

COMMENTS