https://www.youtube.com/watch?v=Ju4X0LCEnqM पर्यटन स्थळे व धार्मिक स्थळांचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्याच्या उद्देशाने आयोजि
पर्यटन स्थळे व धार्मिक स्थळांचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत उमेद अभियानातील कर्मचारी, महिला ग्रामसंघाच्या सदस्या, बचत गटातील महिला तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
या मोहिमेदरम्यान सहभागी महिलांनी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन परिसरातील कचरा, प्लास्टिक व इतर अस्वच्छता दूर करत श्रमदान केले. स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम नसून प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला.
यावेळी पंचायत समिती खुलताबादचे गट विकास अधिकारी मा. प्रकाश नाईक यांनी स्वतः स्वच्छता मोहिमेत सहभागी होत श्रमदान केले. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ऐतिहासिक वारसा स्थळे व धार्मिक स्थळांची स्वच्छता राखणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी आपल्या परिसरासह पर्यटन व तीर्थक्षेत्रे स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या स्वच्छता अभियानास तालुका अभियान व्यवस्थापक सुनील बारबैले पंचायत समिती तालूका व्यवस्थापक देविदास चौधर, पशु व्यवस्थापक आजिनाथ बारगळ, गट शिक्षण अधिकारी विलास केवट, पंचायत समिती चे कृषी अधिकारी बोयणार श्रद्धा ताठे, नरेगा सहाय्यक प्रकल्प अधिकारी अभिजीत गायकवाड, विस्तार अधिकारी मंगेश शिंदे तसेच उमेद च्या CRP व उपजीविका सखी बँक सखी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
उमेद अभियानातील कर्मचारी व महिला बचत गटांच्या सदस्यांच्या सहभागामुळे स्वच्छता मोहिमेला विशेष गती मिळाली. सर्वांनी मिळून केलेल्या श्रमदानामुळे वेरूळ लेणी व घृष्णेश्वर मंदिर परिसर स्वच्छ व आकर्षक दिसू लागला.
या अभियानातून पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणांची काळजी घेण्याबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचला असून, अशा उपक्रमांमुळे पर्यटन स्थळांची सुंदरता व महत्त्व अधिक वाढणार आहे.

COMMENTS