Homeताज्या बातम्या

फसव्या कर्जमाफीविरोधात शासन आदेशाचे दहन; शिवसेनेचा निषेध

शिरूर तालुक्यातील मातोरी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व शेतकर्‍यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर महायुती सरकारच्या कथित फसव्या

रोहित पवार यांच्या सरसकट कर्जमुक्ती आंदोलनाला किसान संघर्ष समितीचा सक्रिय पाठिंबा
रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला शेतकरी हक्क मोर्चाचा पाठिंबाफसव्या कर्जमाफी जीआरची गावोगावी होळी करणार-राजेंद्र आमटे
सरसकट कर्जमाफीसाठी नगर-मनमाड महामार्गावर चक्काजाम  शिंदे शिवसेना शेतकरी सेनेचे राहुरीत आंदोलन



शिरूर तालुक्यातील मातोरी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व शेतकर्‍यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर महायुती सरकारच्या कथित फसव्या कर्जमाफी शासन आदेशाची होळी करून निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा किसान सेना तालुका प्रमुख हरीमामा खेडकर आणि सर्कल प्रमुख प्रवीण घाटे यांनी सरकारच्या कर्जमाफी निर्णयावर टीका केली. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली, तरी तिचा लाभ केवळ कागदोपत्री राहणार असून प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या हातात काहीही पडणार नाही, असा आरोप त्यांनी केला. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते. मात्र, जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीला विविध अटी व शर्ती लावून शेतकर्‍यांना लाभापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतकर्‍यांची सरसकट व बिनशर्त कर्जमाफी करण्यात यावी, अन्यथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांच्या नेतृत्वाखाली शिरूर तालुक्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा हरीमामा खेडकर व प्रवीण घाटे यांनी दिला.

COMMENTS