Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक जेरबंद; भूसंपादन घोटाळा प्रकरणाला वेग; जिल्हाधिकार्‍यांनाच अटक झाल्याने खळबळ

बीड : जिल्ह्यातील कथित भूसंपादन मोबदला घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली असून तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना लातूर येथून पोलिसांनी

जुन्या वादातून जीवघेणा हल्ला; एक गंभीर; नान्नज येथील घटना; लोखंडी रॉड व कोयत्याने मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा
चंदगडमध्ये पोलिसांची मद्यवाहतुकीवर मोठी कारवाई,१४ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त,दोघेजण ताब्यात
कर्जत तालुक्यातील शिंदे गावात मारहाणीच्या भीतीने तरुणाची आत्महत्या, एक ताब्यात

बीड : जिल्ह्यातील कथित भूसंपादन मोबदला घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली असून तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना लातूर येथून पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे जिल्हा प्रशासन व राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भूसंपादन प्रक्रियेदरम्यान जमिनींचे मूल्यांकन वाढवून शासनाकडून अतिरिक्त मोबदला मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय तपास यंत्रणेकडून व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणात काही वरिष्ठ अधिकारी, महसूल विभागातील कर्मचारी तसेच दलालांचा संगनमताने सहभाग असल्याची शक्यता तपासात पुढे येत आहे. या गुन्ह्याचा प्रारंभिक तपास पोलीस उपाधीक्षक पूजा पवार यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र त्या रजेवर गेल्यानंतर तपासाची जबाबदारी उपविभागीय पोलीस अधिकारी एम. व्यंकटराम यांच्याकडे देण्यात आली. तपासादरम्यान समोर आलेल्या कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांच्या नोंदी तसेच इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. त्यानुसार अविनाश पाठक यांना लातूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. अटक केल्यानंतर त्यांना लातूर न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना बीड येथे आणून स्थानिक न्यायालयासमोर उभे करण्यात येईल. या प्रकरणामुळे प्रशासकीय यंत्रणेत मोठी खळबळ निर्माण झाली आहे. एका वरिष्ठ जिल्हाधिकार्‍याच्या अटकेमुळे संपूर्ण प्रकरणाची गंभीरता वाढली आहे. तपास यंत्रणेनुसार, या घोटाळ्यात आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS