बीड : पेठ बीड पोलिसांनी जनावरे चोरी करणार्या टोळीचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण 4,15,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्या

बीड : पेठ बीड पोलिसांनी जनावरे चोरी करणार्या टोळीचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण 4,15,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात गोवंशीय जनावरे व बोलेरो पिकअप वाहनाचा समावेश आहे.
दि. 20/04/2026 रोजी पोलीस निरीक्षक मारुती खेडकर हे स्टाफसह पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की जी.एन. फंक्शन हॉल परिसरात जनावरे चोरी करणारी टोळी पकडली गेली आहे. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळीएमएच-23 एयू-1015 क्रमांकाची बोलेरो पिकअप आणि त्यामध्ये चारही पाय दोरीने बांधलेले गोवंशीय गो-हे आढळून आले. चौकशीदरम्यान हे गो-हे कत्तलीसाठी नेले जात असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींची नावे अशीम जाफर कुरेशी (महमदीया कॉलनी), अजिम आझाद कुरेशी (महमदीया कॉलनी) आणि शहनवाज एजाज कुरेशी (कुरेशी मोहल्ला, पेठ बीड) अशी आहेत. या प्रकरणी फिर्यादी सईद अब्दुल करीम कुरेशी (मोमीनपुरा) यांच्या तक्रारीवरून पेठ बीड पोलीस ठाण्यात गु.र.नं. 116/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 3(5) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एक गोवंशीय गो-हे (15,000) आणि बोलेरो पिकअप वाहन (4,00,000) असा एकूण 4,15,000 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार माने करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती खेडकर व त्यांच्या पथकाने केली.

COMMENTS