ज्येष्ठ पत्रकार चंदन मित्रा यांचे निधन

Homeताज्या बातम्यादेश

ज्येष्ठ पत्रकार चंदन मित्रा यांचे निधन

नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार चंदन मित्रा यांचे बुधवारी रात्री उशिरा दिल्लीत झाले. मित्रा द पायनियरचे संपादक आणि व्यवस्थापकीय संचालक अ

खंडेलवाल बहिण-भाऊ सायकलवरुन करणार नगर ते स्टॅच्यु ऑफ युनिटीचा प्रवास
नवले पुलावरील जाळपोळप्रकरणी गुन्हे दाखल
पुण्यात टाळेबंदी नाही होणार

नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार चंदन मित्रा यांचे बुधवारी रात्री उशिरा दिल्लीत झाले. मित्रा द पायनियरचे संपादक आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या मित्रा यांनी 65 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

स्व. मित्रा ऑगस्ट 2003 ते 2009 पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. जून 2010 मध्ये ते मध्य प्रदेशमधून भाजपाकडून राज्यसभेत निवडून आले. मित्रा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे निकटवर्तीय होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून मित्रा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. “चंदन मित्रा जी त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे आणि अंतर्दृष्टीमुळे कायम स्मरणात राहतील. राजकारणासोबतच माध्यमांच्या जगातही त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. त्यांच्या निधनामुळे मी दुःखी असून त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. ओम शांती,” असं पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटलेय. याशिवाय भाजप नेते नितीन गडकरी राम माधव, राज्यसभेचे खासदार स्वपन दासगुप्ता यांच्यासह अनेक नेत्यांनी मित्रा यांना श्रद्धांजली अर्पण केली.

COMMENTS