Homeताज्या बातम्या

राज्यस्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धेत तुलसी इंग्लिश स्कूलच्या तीन खेळाडूंची निवड; बीडच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी

बीड: देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी थायबॉक्सिंगमध्ये दमदार कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे

विकासाच्या शर्यतीत कर्जत-जामखेड मागे राहू देणार नाही: सभापती प्रा. राम शिंदे; योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांची दमदार कामगिरी! जबरी चोरी, घरफोडी, सोलार प्लांटवर चोरी करणारी टोळी केली जेरबंद
एनसीईआरटी-सीबीएसई अभ्यासक्रमात शिवरायांच्या इतिहासास न्याय द्या; खासदार नीलेश लंके यांची लोकसभेत मागणी

बीड: देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी थायबॉक्सिंगमध्ये दमदार कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेतील उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या क्रीडा कामगिरीत आणखी एका गौरवशाली यशाची नोंद झाली आहे.

दि. १३ जुलै रोजी थायबॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या दमदार कामगिरीच्या जोरावर दि. २५ व २६ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणार्‍या राज्यस्तरीय थायबॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी शाळेच्या तीन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या खेळाडूंमध्ये आकाश अविनाश जाधव (सब-ज्युनियर, ४८ किलोखालील वजनगट), राजवर्धन जगन्नाथ चव्हाण (सब-ज्युनियर, ४० किलोखालील वजनगट) आणि हर्षद महादेव शिरसाठ (ज्युनियर, ६५ ते ७० किलो वजनगट) यांचा समावेश आहे.

या यशामागे थायबॉक्सिंग प्रशिक्षक मोसिम शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत यशस्वी मजल मारली आहे.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या उमा जगतकर यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षकवृंदानेही विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत आगामी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त केला. संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे अभिनंदन करत, राज्यस्तरीय स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करून शाळा आणि बीड जिल्ह्याचे नाव राज्यभर उज्ज्वल करावे, असा विश्वास व्यक्त केला व सर्व खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

COMMENTS