HomeUncategorized

इस्लामपूर भाजपा युवा मोर्चाचे अभिजीत खडके यांचे अपघाती निधन

इस्लामपूर / प्रतिनिधी : वाळवा तालुका भाजपा युवा मोर्चाचा चिटणीस अभिजीत मुरलीधर खडके (वय 28) यांचा शनिवारी रात्री आष्टा-बागणी मार्गावर अपघात होऊन

कोयनेत गढूळ पाणी पुरवठा; प्रकल्पावर महिलांचा हंडा मोर्चा
उपजिल्हा रुग्णालयातील वीज तोडल्याने डायलिसिस सेवा ठप्प
औंधची गौरवशाली परंपरा जपण्याचे काम करूया : पोलीस अधीक्षक बाळसिंग रजपूत

इस्लामपूर / प्रतिनिधी : वाळवा तालुका भाजपा युवा मोर्चाचा चिटणीस अभिजीत मुरलीधर खडके (वय 28) यांचा शनिवारी रात्री आष्टा-बागणी मार्गावर अपघात होऊन मृत्यू झाला. अभिजीत हे आई वडिलांसह इस्लामपूर शहरात गेल्या अनेक वर्षापासून रहात होते. त्यांचे मुळगांव कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील मौजे आरग हे आहे.
अभिजीत यांच्या निधनाची बातमी शनिवारी रात्री इस्लामपूर शहरासह आरग गावांत समजताच कुटुंबासह मित्र परिवारावर शोककळा पसरली. मौजे आरग येथे सोमवार, दि. 31 रोजी रक्षाविसर्जन होणार आहे. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, विवाहित बहीण असा परीवार आहे. इस्लामपूर शहर भाजपा वतीने त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. उरुण इस्लामपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी अभिजीत यांच्या अपघाती निधनाने दु:ख व्यक्त केले. एक चांगल्या कार्यकर्त्याला मुकलो असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

COMMENTS