Homeताज्या बातम्या

हळदीच्या दरावरून नांदेड मोंढा बाजारात शेतकर्‍यांचा संताप; लिलाव बंद पाडत बाजारपेठ ठप्प

नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढा बाजारात हळदीला अत्यल्प बाजारभाव मिळत असल्याच्या निषेधार्थ शेतकर्‍यांनी सोमवारी खरेदीचा लिलाव (बीट

कर्जमाफीत शेतकऱ्यांची संतापजनक फसवणूक
कृषी खात्यातील निविष्ठा खरेदी भ्रष्टाचाराची एसआयटीमार्फत चौकशी करातुकाराम मुंढे यांची नियुक्ती करावी – वसंत मुंडे
दैनिक लोकमंथनच्या बातमीचा दणकाप्रयोगशाळेने उमरीतील ‘झिंकेटेड’ खताचे दोन्ही नमुने निकृष्ट ठरवले; कृषी विभागाची क्लिनचिट फोल



नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढा बाजारात हळदीला अत्यल्प बाजारभाव मिळत असल्याच्या निषेधार्थ शेतकर्‍यांनी सोमवारी खरेदीचा लिलाव (बीट) बंद पाडत तीव्र आंदोलन छेडले. ऑनलाइन बाजारभाव आणि प्रत्यक्ष लिलावातील दरामध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप करत, योग्य भाव मिळाल्याशिवाय हळदीचा लिलाव सुरू होऊ देणार नाही, असा इशारा शेतकर्‍यांनी दिला.
शेतकर्‍यांच्या म्हणण्यानुसार, हळदीचा ऑनलाइन बाजारभाव प्रतिक्विंटल सुमारे 20 हजार ते 21 हजार हजार इतका दाखवला जात असताना प्रत्यक्ष लिलावाची सुरुवात मात्र 12 हजार पासून केली जाते. चांगल्या प्रतीच्या हळदीलादेखील 15 हजार ते 15 हजार 500 पेक्षा अधिक दर मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याची खंत शेतकर्‍यांनी व्यक्त केली. बाजारातील मोजके व्यापारी संगनमत करून बोली लावत कृत्रिमरीत्या दर कमी ठेवत असल्याचा गंभीर आरोपही आंदोलकांनी केला. स्पर्धात्मक बोली न लागल्याने शेतकर्‍यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. दराबरोबरच देयकाच्या पद्धतीवरही शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली. तत्काळ पैसे हवे असल्यास तीन टक्के कपात करून रक्कम दिली जाते, तर पूर्ण रक्कम हवी असल्यास 45 ते 50 दिवस प्रतीक्षा करावी लागते, असा आरोप करण्यात आला. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांची अधिकच कोंडी होत असल्याचे त्यांनी नमूद केले.मोंढा बाजारात दूरवरून येणार्‍या शेतकर्‍यांसाठी पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था, नाश्त्याची सुविधा किंवा वाहनतळ यांसारख्या मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याची तक्रार करण्यात आली.ऑनलाइन दराच्या तुलनेत किमान वाजवी भाव मिळेपर्यंत आणि बाजारातील व्यवहारात पारदर्शकता आणेपर्यंत हळदीचा लिलाव सुरू होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकर्‍यांनी घेतली आहे. या आंदोलनामुळे मोंढा बाजारातील हळदीची खरेदी-विक्री ठप्प झाली असून, बाजार समिती प्रशासन आणि व्यापार्‍यांनी तातडीने हस्तक्षेप करून तोडगा काढण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

COMMENTS