देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा पोलिस चौकी पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या घरासमोर लावलेल्या मोटारसायकली एकाच रात्री चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे मोटारसायकल चोर चारचाकी कार मधून आले मोटारसायकल चोरी करुन टाकळीमिया मार्गे निघून गेले. मोटारसायकल चोरी प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी देवळाली प्रवरा येथील एका राहत्या घरासमोर उभ्या असलेल्या दोन दुचाकी गाड्यांवर डल्ला मारला.यामध्ये टीव्हीएस कंपनीची अपाचे (क्रमांक एम पी 46 झेड एफ 3922 ) तसेच रॉयल एनफिल्ड कंपनीची क्लासिक ३५० (क्रमांक एम एच १७सीसी 5445) या गाड्यांचा समावेश असून,एकूण अंदाजे १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. या प्रकरणी फिर्यादी लालू वेचान वासकलने (वय २१, व्यवसाय मजुरी, मूळ रा. मध्य प्रदेश, सध्या रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार नवले हे करीत आहे.

COMMENTS