Homeताज्या बातम्या

प्रवाशांचे प्राण वाचविणाऱ्या चौघांचा श्रीगोंद्यात गौरव

श्रीगोंदा :  श्री छत्रपती संभाजीनगर ते इचलकरंजी या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला लागलेल्या भीषण आगीतून तब्बल ३८ वारकरी प्रवाशांचे प्राण वाचविणाऱ्या चौघांचा श्रीगोंद्यात सन्मान करण्यात आला. अग्नीपंख फाउंडेशन व संत शेख महंमद महाराज यात्रा कमिटीच्या वतीने ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम दक्ष नागरिक’ पुरस्कार, सन्मानपत्र व गौरवचिन्ह देण्यात आले.हा गौरव समारंभ नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, श्रीगोंदा पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, अग्नीपंख फाउंडेशनचे विश्वस्त सुदाम झराड आणि संत शेख महंमद महाराज यात्रा कमिटीचे अध्यक्ष गोपाळराव मोटे यांच्या हस्ते पार पडला.यावेळी सोनिया गांधी पॉलिटेक्निकचे प्राचार्य अमोल नागवडे, वैभव पवार, गणेश शितोळे (भानगाव) आणि दिलीपराव विघ्ने (बीड) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना राजेंद्र नागवडे म्हणाले, “आजच्या काळात एखादी दुर्घटना घडल्यास मदत करण्याऐवजी फोटो किंवा व्हिडिओ काढण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र प्राचार्य अमोल नागवडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोणताही विलंब न करता बस थांबवून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्याचे कार्य केले. त्यांचे धाडस आणि सामाजिक बांधिलकी प्रेरणादायी असून अग्नीपंख फाउंडेशनने केलेला हा सन्मान समाजासाठी आदर्श ठरणारा आहे.”सन्मानाला उत्तर देताना प्राचार्य अमोल नागवडे यांनी बसला आग लागल्यानंतरची संपूर्ण घटना, त्यावेळी घेतलेली दक्षता, प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्या प्रसंगातील अनुभव उपस्थितांसमोर मांडले.कार्यक्रमास नानासाहेब कोंथबीरे, अशोक आळेकर, पोपट बोरुडे, किसन आघाव, नवनाथ खामकर, सुदास झुंजरुक, राजू मोटे, सूर्यभान गोलांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल चव्हाण यांनी केले, तर आभार नवनाथ दरेकर यांनी मानले.

परिवहन मंत्र्यांनी प्रथम बससह कर्मचाऱ्यांची पूर्तता करावी : श्रीगोड
भोकर आगाराला ’राजमाता जिजाऊ’च्या पाच नव्या बसांची भेटनगराध्यक्ष भगवानराव दंडवे यांच्या हस्ते लोकार्पण
तलवाडा बस स्थानकावर वाहतूक नियंत्रकाचा ‘लपंडाव’; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

COMMENTS