जामखेड : कर्जत-जामखेड या दोन तालुक्यांसाठी कर्जत येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापनेला दि. २८ जूलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे कर्जत वकिल संघटनेने दीर्घकाळ दिलेल्या लढ्याला आणि आमदार रोहित पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.कर्जत आणि जामखेड येथील पक्षकार आणि त्यांच्या अशिलांना श्रीगोंदा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जावे लागत होते. त्यामुळे येथील वकीलांसह न्याय मागणाऱ्या लोकांचीही गैरसोय होत होती, तसेच श्रीगोंदा येथील अंतर लक्षात घेता जाण्यायेण्यासाठी वेळ खर्च होत होता. त्यामुळे कर्जत आणि जामखेड या दोन तालुक्यांसाठी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन करण्याची मागणी वकील आणि नागरिकांकडून होत होती. त्यासाठी त्यांनी दीर्घकाळ पाठपुरावाही केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठानेही ही मागणी मान्य केली परंतु केवळ आर्थिक तरतुदीअभावी सरकारकडून मंजुरी देण्यात येत नव्हती.त्यासाठीही कर्जत वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. संग्राम ढेरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारकडे पाठपुरावा केला होता. तसेच आमदार रोहित पवार यांनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधी व न्याय विभागाला पत्र दिले होते. सतत पाठपुरावा केला होता .तसेच न्यायाधीशांच्या निवासासाठी आवश्यक करार देखील पूर्ण करण्यात आलेला आहे. आता न्यायालय सुरू झाल्याने कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यांतील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर सोय होणार असून सामान्य नागरिक, पक्षकार आणि वकील यांना मोठा दिलासा मिळणार आहे.‘‘कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी कर्जतमध्ये अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन करण्यास कॉबिनेटने मंजुरी दिल्याबद्दल सरकारचे आभार! कर्जत वकील संघटनेने यासाठी दीर्घकाळ पाठपुरावा केला होता, तसंच लोकप्रतिनिधी हा प्रस्ताव तातडीने मंजूर व्हावा म्हणून मंत्रालय पातळीवर प्रयत्नशील होतो. शेवटी हा लोकांच्या न्यायाचा विषय आहे. आता कर्जतलाच अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन झाल्यामुळं येथील पक्षकारांचा श्रीगोंदा इथं जाण्यासाठी खर्च होणारा पैसा आणि वेळ वाचणार आहे. या निर्णयाबद्दल कर्जत वकील संघाचे अध्यक्ष ऍड. संग्राम ढेरे, ऍड.बाळासाहेब शिंदे, ऍड. धनंजय राणे, ऍड. अभय खेतमाळस यांच्यासह यासाठी पाठपुरावा केलेल्या यापूर्वीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन .- आ. रोहित पवार

COMMENTS