Homeताज्या बातम्या

पीक विम्यासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करा : सोनवणे 

कोपरगाव : सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी राज्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून खरीप हंगामातील बाजरी, तूर, मका, सोयाबीन, कापूस, भुईमूग आणि खरीप कांदा या सात पिकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. पात्र शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत पीक विम्यासाठी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी केले आहे.महाराष्ट्र शासनाच्या ३ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना यंदापासून लागू करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी यावर्षी इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, अन्नधान्य व कडधान्य पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के, तर व्यापारी पीक असलेल्या कापूस व खरीप कांद्यासाठी पाच टक्के विमा हप्ता भरावा लागणार आहे.कोपरगाव तालुक्यासाठी विविध पिकांची विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार कापूस प्रतिहेक्टर  ६५ हजार रुपये,  खरीप कांदा  ७५ हजार रुपये, सोयाबीन ६२ हजार ५००रुपये, तूर  ४७ हजार रुपये, भुईमूग ४५ हजार रुपये, मका  ४० हजार रुपये आणि बाजरी  ३२ हजार रुपये इतकी संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार कापसासाठी प्रतिहेक्टर  १,९५० रुपये, खरीप कांद्यासाठी  १,५०० रुपये, सोयाबीनसाठी  १,२५० रुपये, तुरीसाठी  ९४० रुपये, भुईमुगासाठी  ९०० रुपये, मक्यासाठी  ८०० रुपये आणि बाजरीसाठी  ६४०  रुपये इतका विमा हप्ता भरावा लागणार आहे.योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक असणे बंधनकारक आहे. तसेच जमिनीची कागदपत्रे, पीक लागवड घोषणापत्र, आधार क्रमांक आणि आधारशी संलग्न बँक खाते आवश्यक राहणार आहे.  

विश्वकर्मा परिवारातर्फे रविवारी शिर्डीत पुरस्कार वितरण; समाजरत्न आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त बेलापूरमध्ये रक्तदान शिबीर उत्साहात पारदर्शक
ओव्हरफ्लोच्या पाण्यातून सर्व साठवण तलाव भरून घ्या : आ. काळे
Taluka Coordinator appointed by Crop Insurance Company | marathi news

COMMENTS