Homeव्हिडीओ

कर्जमाफीत शेतकऱ्यांची संतापजनक फसवणूक

https://youtu.be/xkLYf6y2YCQ कर्जमाफीसाठी सरकारने काढलेल्या शासन आदेशामध्ये अत्यंत जाचक अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या वेळ

चाहुल लागलेल्या मान्सूनचे स्वागत! 
शेतकर्‍यांनी सावधगिरी बाळगून पेरणी करावीमुख्यमंत्री फडणवीस: ड्रग्जविरोधी मोहीम तीव्र सुरू
मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी नांदेडवर पावसाचा दमदार प्रहार; वादळी वारे, विजांचा कडकडाट अन् शहर अंधारात

कर्जमाफीसाठी सरकारने काढलेल्या शासन आदेशामध्ये अत्यंत जाचक अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या वेळची कर्जमाफी आज पर्यंतच्या सर्व कर्जमाफ्यांमध्ये सर्वात कडक अटी शर्ती असलेली व खूप कमी शेतकऱ्यांना लाभ देणारी ठरणार आहे. 2019 मध्ये कर्जमाफी घेतलेले शेतकरी, ज्यांची संख्या तब्बल 32 लाख 29 हजार इतकी आहे, जरी ते यावेळी थकित असले तरी त्यांना केवळ 50 हजार रुपयांच्या मर्यादेत कर्जमाफी देण्यात येणार आहे. नियमित कर्जदारांना सुद्धा केवळ 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यांनाही किमान दोन वर्ष नियमित कर्जदार असणे ही अट टाकण्यात आली आहे. अत्यल्प पगारावर राबणाऱ्या सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन द्यायचे आणि आता 2 लाख कर्ज माफ करणार सांगून बहुसंख्य शेतकऱ्यांची केवळ 50 हजारावर बोळवणूक करायची ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे. शेतकऱ्यांची घोर फसवणूक आहे. असे अखिल भारतीय किसान सभा,महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डॉ अजित नवले यांनी म्हटले आहे

COMMENTS