Homeताज्या बातम्या

धाडसी महिला वाहकामुळे वृद्धेचे सोने सुरक्षित परतचोरट्या महिलेला पाठलाग करून पकडले; आलिशा बागवान यांच्या प्रसंगावधानाचे कौतुक

आष्टी आगाराच्या कडा-मिरजगाव बसमध्ये घडलेली चोरीची घटना महिला वाहकाच्या धाडसामुळे निष्फळ ठरली. बसमधील गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेची सोन्याचे दाग

आष्टी येथे ’पाटील फार्मा एजन्सीज’चे उद्घाटनआ.सुरेश धस,माजी आ.साहेबराव दरेकर, भिमराव धोंडे, सतिश शिंदे, आदींनाथ महाराज दानवे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती
चिंचाळा येथे कृषी दिनानिमित्त भव्य कार्यक्रम; मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणसेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत – प्राचार्य डॉ. श्रीराम आरसूळकृषी महाविद्यालयाने चिंचाळा गावात विविध कृषीविषयक उपक्रम राबवावेत – सरपंच पंडित कल्याण पोकळे
तर्कशक्ती, अध्यात्म आणि समाजप्रबोधनाचा अनोखा संगमह.भ.प. राजू महाराज लोखंडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवपद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने व अभिनेत्री मेघना झुझम यांच्या हस्ते सन्मान



आष्टी आगाराच्या कडा-मिरजगाव बसमध्ये घडलेली चोरीची घटना महिला वाहकाच्या धाडसामुळे निष्फळ ठरली. बसमधील गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेची सोन्याचे दागिने असलेली पिशवी घेऊन पळणार्‍या चोरट्या महिलेला महिला वाहक आलिशा बागवान यांनी प्रसंगावधान राखत पकडले आणि वृद्धेचे सुमारे एक तोळे सोन्याचे दागिने सुरक्षित परत मिळवून दिले.
शनिवारी सायंकाळी आष्टी आगाराची कडा-मिरजगाव बस मिरजगाव बसस्थानकावरून कड्याकडे रवाना होत असताना बसमध्ये मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत एका महिलेने बसमधील वृद्ध प्रवासी महिलेच्या पिशवीवर नजर ठेवली. संधी साधून तिने पिशवी हिसकावली आणि बसमधून उतरून पळ काढला. पिशवी चोरीला गेल्याचे लक्षात येताच वृद्ध महिलेने आरडाओरड केली. हा प्रकार समजताच महिला वाहक आलिशा बागवान यांनी क्षणाचाही विलंब न करता चोरट्या महिलेचा पाठलाग केला. काही अंतरावर तिला पकडून तिच्याकडील पिशवी ताब्यात घेतली. पिशवीतील एक तोळे सोन्याचे दागिने सुरक्षित असल्याची खात्री करून त्यांनी ते वृद्ध महिलेच्या स्वाधीन केले. महिला वाहक आलिशा बागवान यांच्या धाडसी आणि तत्पर कृतीचे प्रवासी व नागरिकांनी कौतुक केले. त्यांच्या सतर्कतेमुळे वृद्ध महिलेचा आयुष्यभराचा जपलेला ऐवज सुरक्षित परत मिळाला.
पोरी, तू साक्षात देवाच्या रूपात भेटलीस!
हरवलेले सोने परत मिळण्याची आशा जवळपास संपली असताना आलिशा बागवान यांनी धाडस दाखवत चोरट्या महिलेला पकडले. सोन्याचे दागिने पुन्हा हातात पडताच वृद्ध महिलेच्या डोळ्यांत अश्रू तरळले. भावूक होत त्या म्हणाल्या, पोरी, तू साक्षात देवाच्या रूपात भेटलीस. माझे आयुष्यभराचे जपलेले सोने तू मला परत मिळवून दिलेस. त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांचेही डोळे पाणावले.

COMMENTS