Homeताज्या बातम्या

बालकांच्या मृत्यूप्रकरणी जनआक्रोश ; श्रीगोंद्यात सर्वपक्षीय मोर्चासंबंधित प्रशासनावर गंभीर आरोप ; कठोर कारवाईची मागणी

श्रीगोंदा  : तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे वीरा आणि आनंदी कांडेकर या दोन चिमुकल्यांच्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी संतप्त नागरिकांनी सोमवारी (२७ जुलै) श्रीगोंदा शहरात सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा काढत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची  मागणी केली. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.मोर्चादरम्यान आंदोलनकर्त्यांनी संबंधित डॉक्टर डॉ. प्रशांत मुळे आणि डॉ. शैला डांगे यांच्यावर गंभीर आरोप करत, वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध करून न दिल्यामुळे दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला. या प्रकरणात संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आला. “दोषींना अटक करा”, “निष्पाप बालकांना न्याय मिळालाच पाहिजे”, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला.यानंतर मोर्चाचे प्रतिनिधींनी पोलीस उपाधीक्षक मयूर क्षीरसागर आणि तहसीलदार सचिन डोंगरे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. निवेदनात संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करणे, पोलिसांच्या भूमिकेची चौकशी करणे, आंदोलनकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेणे आणि संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन किंवा उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.या जनआक्रोश मोर्चात माजी आमदार राहुल  जगताप, राजेंद्र  नागवडे, मनोहर  पोटे, राजेंद्र म्हस्के, बाळासाहेब नाहटा, टिळक भोस, स्मितल वाबळे, अनिल ठवाल, जहीर जकाते, अरविंद कापसे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.मोर्चा दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपआंदोलनादरम्यान पोलिसांकडून मोर्चा दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी पोलीस प्रशासनावर दबावाचे राजकारण केल्याचा आरोप करण्यात आला. तसेच टिळक भोस, स्मितल वाबळे आणि इतर १५ प्रमुख व्यक्तींवर हेतुपुरस्सर गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करत त्या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

औषधांचा व्यापार आणि आरोग्य ?
युरोपमध्ये विक्रमी उष्णतेचा कहर; तेराशेहून अधिक मृत्यू
विनापरवाना आयव्हीएफ आणि गर्भलिंग केंद्र रडारवरमकोका कायद्याअंतर्गत कारवाईचा आरोग्यमंत्री आबिटकर यांचा इशारा

COMMENTS