Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पो. नि. प्रताप दराडे यांच्या नियुक्तीची राहूरीकरांनी केली मागणी

देवळाली प्रवरा/ प्रतिनिधीः राहुरी येथील पोलिस निरीक्षक मेघःशाम डांगे हे दिनांक 31 मे 2023 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. तालुक्यातील नागरिकांनी पोलीस

काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ ७ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात. 
पाथर्डीच्या पोलिस निरीक्षकासह एक कर्मचारी निलंबित ; फुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याचा ठपका
हळदी समारंभासाठी रस्ता अडवला, नवरदेवावर गुन्हा

देवळाली प्रवरा/ प्रतिनिधीः राहुरी येथील पोलिस निरीक्षक मेघःशाम डांगे हे दिनांक 31 मे 2023 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. तालुक्यातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची नियुक्ती व्हावी अशी मागणी पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे.
 राहुरी पोलिस ठाण्याचा पदभार घेण्यासाठी अनेक पोलिस निरीक्षक आपली ताकद लावत आहेत. राहुरी पोलिस ठाण्यात आयपीएस अधिकारी रेड्डी हे प्रशिक्षणार्थी म्हणून येत असल्याची चर्चा देखील सुरू आहे. राहुरी पोलिस ठाण्यात गेल्या काही वर्षांपासून अधिकारी टिकत नाहीत. 2019 मध्ये मुकुंद देशमुख यांनी पोलिस ठाण्याचा पदभार घेतला होता. दिड वर्षात त्यांची बदली झाली.त्यानंतर हनुमंत गाढे यांनी पदभार घेतला.सहा महिन्यानंतर ते सेवानिवृत्त झाले. नंदकुमार दुधाळ यांनी पदभार घेतला. मात्र सहा महिन्यात ते वादग्रस्त ठरल्याने त्यांची बदली झाली.त्याजागी राजेंद्र इंगळे हे पोलिस निरीक्षक म्हणून राहुरी पोलिस ठाण्यात आले. त्यांचा कार्यकाल पाच महिने झाला होता. दरम्यान पोलिस कोठडीतून पाच आरोपींनी गज तोडून पलायन केल्याने त्याचा ठपका ठेवून राजेंद्र इंगळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
त्यानंतर प्रताप दराडे यांनी पदभार घेतला. त्यांनी अकरा महिन्याच्या कार्यकालात तालूक्यात कायदा व सुव्यवस्था राखून ठेवली. गुन्हेगारीवर वचक ठेवण्यात त्यांना यश आले होते. छोटेमोठे भामटे व रोडरोमिओंनी त्यांचा चांगलाच धसका घेतला होता. थोड्याच कालावधीत त्यांनी राहुरीकरांची मने जिंकून तालूक्यात खाकीचा दबदबा निर्माण केला होता. परंतू  विधानसभेच्या लक्षवेधीत त्यांची उचलबांगडी केल्याने राहुरी पोलीस ठाण्यात एक वर्षापेक्षा अधिक काळ टिकले नाही.
               त्यानंतर मेघःशाम डांगे यांनी पदभार घेतला. त्यानंतर त्यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली. काही गुन्ह्यांचा छडा लावून आरोपींना गजाआड केले. तर तालूक्यातील अनेक प्रकरणे त्यांनी समुपदेशाने मिटवली. ते खाकीचा ठसा उमटवत लोकप्रियतेच्या मार्गावर असताना त्यांचा अवघ्या पाच महिन्यात शासकीय सेवेच्या नियमाप्रमाणे ते 31 मे 2023 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून राहुरी पोलिस ठाण्यात अधिकारी जास्त काळ टिकले नाहीत. तालूक्यातील गुन्हेगारी पुन्हा वाढणार असे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे राहुरी पोलिस ठाण्यात आता एका चांगल्या खमक्या अधिकार्‍याची गरज भासत आहे.

COMMENTS