Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हनुमान मंदिरामध्ये नांदेडमध्ये श्री स्वामी मच्छिंद्रनाथांच्या दिव्य पादुकांचे दोन एप्रिलला दर्शन

नांदेड : नाथ संप्रदायाचे आद्य नाथाचार्य, महान योगी आणि हठयोगाचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे श्री स्वामी मच्छिंद्रनाथ (मत्स्येंद्रनाथ) यांच्या दिव्य प

नांदेडमध्ये मटका साम्राज्यावर डीआयजी पथकाचा घणाघात; शहर पोलीस झोपेत होते का?13 आरोपी जेरबंद, 92 हजारांचा मुद्देमाल जप्त; अवैध धंद्यांना राजकीय छत्रछाया असल्याची चर्चा
राज्यात खाजगी कोचिंग क्लासेस विनियमन कायदा लागू करा; अन्यथा २९ जूनपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण – गणेश दाढे
परशुराम जयंतीच्या पूर्वी परशुराम चौकाचे सुशोभीकरण करा; महापालिका आयुक्तांनी तातडीने लक्ष द्यावे

नांदेड : नाथ संप्रदायाचे आद्य नाथाचार्य, महान योगी आणि हठयोगाचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे श्री स्वामी मच्छिंद्रनाथ (मत्स्येंद्रनाथ) यांच्या दिव्य पादुकांचे दर्शन नांदेडकर भक्तांसाठी उपलब्ध होणार आहे. भगवान शंकरांकडून योगविद्या प्राप्त करणारे हे आद्य महायोगी नाथ संप्रदायातील नऊ नाथांपैकी प्रमुख मानले जातात. त्यांना ‘आदिनाथ’ शिवाचा अवतार मानण्याची श्रद्धा भाविकांमध्ये दृढ आहे.
हनुमान जयंतीच्या पवित्र निमित्ताने गुरुवार, दि. 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी 5 ते 11 या वेळेत अशोकनगर येथील श्री हनुमान मंदिरात या दिव्य पादुकांचे दर्शन भक्तांसाठी खुले राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील मिटमिटा परिसरातून येणार्‍या या पादुका भक्तांसाठी आध्यात्मिक उर्जा आणि भक्तिभावाचा अनोखा अनुभव देणार्‍या ठरणार आहेत. या पवित्र सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी नांदेड व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री हनुमान मंदिर ट्रस्ट, अशोकनगर, नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे. भक्तांसाठी हा योग साधना, श्रद्धा आणि भक्तीचा अद्वितीय संगम ठरणार आहे.

COMMENTS