Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वसंतदादा पाटील महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

पाटोदा प्रतिनिधी - येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची

वसंतदादा पाटील महाविद्यालयात घेतली अवयवदान प्रतिज्ञा
वसंतदादा पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
वसंतदादा पाटील महाविद्यालयाचा अनिल खेडकर करणार युवा संसदेत बीड जिल्ह्याचे नेतृत्व

पाटोदा प्रतिनिधी – येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे होते. त्यांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रोफेसर किशोर मचाले, उपप्राचार्य डॉ. गणेश पाचकोरे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. नामदेव चांगण, पर्यवेक्षक प्रा. अनिल जोगदंड, हिंदी विभाग प्रमुख डॉ. बळीराम राख, ग्रंथपाल प्रा. जगन्नाथ पटाईत आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. कुशाबा साळुंके यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यसंपदेबद्दल विवेचन करून त्यांच्या शाहिरीच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या समाजपरिवर्तन कार्याचा परिचय करून दिला. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे म्हणाले की अण्णाभाऊंच्या लेखणीतून दलीत व शोषित समाजाचे जिवंत चित्रण व त्यांचा प्रस्थापित समाजव्यवस्थे विरूध्दचा लढा दिसून येतो. सूत्रसंचालन डॉ. बबन मोहिते यांनी केले. आभार प्रा. जगन्नाथ पटाईत यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते

COMMENTS