Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऑपरेशन ‘क्रॅक डाऊन’ अंतर्गत अवैध रेती माफियावर पोलिसांचा छापा; 47.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड : नांदेड ग्रामीण पोलीसांनी ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ अंतर्गत गोदावरी नदी पात्रातील अवैध रेती उपसा करणार्‍या माफियांवर मोठी कारवाई करत सुमारे 47

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई ; ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’मध्ये 43 लाखांचा अवैध शस्त्रसाठा जप्त
मोडाल, तर पोलीस खाक्या दाखवणार-पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार

नांदेड : नांदेड ग्रामीण पोलीसांनी ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ अंतर्गत गोदावरी नदी पात्रातील अवैध रेती उपसा करणार्‍या माफियांवर मोठी कारवाई करत सुमारे 47 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 4 मे रोजी सायंकाळी पिंपळगाव निमजी शिवारातील गोदावरी नदी पात्रात करण्यात आली.
या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 501/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 3(5) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश  कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिज उत्खननाविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखालील पथक गस्त घालत असताना 4 मे रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता गोपनीय माहिती मिळाली. पिंपळगाव निमजी परिसरातील गोदावरी नदी पात्रात काही जण अवैध रेती उपसा करून साठवण करत असल्याची माहिती मिळताच पथकाने तातडीने कारवाईचा निर्णय घेतला. सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास पंचांसह घटनास्थळी छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी शंकर व्यंकटराव डक, चांदु व्यंकटराव डक आणि पांडुरंग सदाशिव डक (सर्व रा. पिंपळगाव निमजी) हे अवैध रेती उपसा करताना आढळून आले. घटनास्थळावरून 40 तराफे (प्रत्येकी अंदाजे 50 हजार रुपये), नऊ जुनी इंजिने आणि 5 ब्रास रेती असा एकूण 47 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नदी पात्रातील तराफे व इंजिन बाहेर काढणे शक्य नसल्याने ते जागीच नष्ट करण्यात आले. तसेच नदीकाठावर साठवून ठेवलेली रेती पंचनामा करून जप्त करण्यात आली आणि पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक बाबुराव चव्हाण तसेच शेख जमीर, कदम यांसह इतर कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला. या धाडसी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी संबंधित पथकाचे कौतुक केले आहे. अवैध रेती उपशावर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

COMMENTS