Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जातीय सलोख्यानेच विश्वशांती-सर्वधर्मसमभावाची गरज; राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांचे प्रतिपादन

माहूर : माहूर येथे रमजान ईद निमित्त आयोजित स्नेह मिलन व शीरखुर्मा कार्यक्रमात सर्वधर्मीय नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्यात आला. हाजी ट्रेडर्सचे

‘बिंदू नामावली’चा खेळखंडोबा : दीड वर्षे फाईल थंडगार
दर्पण दिना निमित्त कुंडलवाडी पोलीस स्टेशन वतीने पत्रकार बांधवांना हेतूचित सन्मान करण्यात आले
मानवतेची महान सेवा – जीवनदान देणार्‍या एम्ब्युलन्स सेवेचा भोकरमध्ये भव्य शुभारंभ

माहूर : माहूर येथे रमजान ईद निमित्त आयोजित स्नेह मिलन व शीरखुर्मा कार्यक्रमात सर्वधर्मीय नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्यात आला. हाजी ट्रेडर्सचे संचालक इरशाद मकरानी यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वधर्मसमभाव अत्यंत आवश्यक असून जातीय सलोखा हाच विश्वशांतीचा पाया आहे. विविध धर्म, पंथ आणि समाज एकत्र येऊन परस्पर सन्मान व बंधुता जोपासल्यास समाज अधिक सुदृढ होईल, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी इरशाद मकरानी यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्नेह मिलनातून समाजात ऐक्य, बंधुता आणि सौहार्द वाढीस लागण्यास निश्चितच मदत होईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल इरशाद मकरानी यांना सर्वांनी शुभेच्छा देत पुढील सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहन दिले.

COMMENTS