Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून ‘केरला स्टोरी पार्ट टू’ चे पाचही मोफत शो हाऊसफुल्ल

नांदेड : हिंदू मुलींमध्ये जागृती निवर्माण करण्याच्या उद्देशाने धर्मभूषण ड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून ‘केरला स्टोरी पार्ट टू’ या चित्रपटाचे

डी-मार्ट तिहेरी हत्याकांडाचा तपास वेगात; आश्रयदात्यांवरही पोलिसांनी फास आवळला;आणखी 2 आरोपी जेरबंद; मुख्य सूत्रधार साई लाला अद्याप फरार
खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेची बैठक
पालकमंत्री पोलीस प्रशासनाचे कान उपटायला आले होते की मोबाईल वाटप सोहळ्यासाठी? नांदेडकरांचा संतप्त सवालनिष्क्रिय पालकमंत्री, स्वतःची पाठ थोपटून घेणारे पोलीस प्रशासन यामधून जनतेची निव्वळ करमणूक

नांदेड : हिंदू मुलींमध्ये जागृती निवर्माण करण्याच्या उद्देशाने धर्मभूषण ड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून ‘केरला स्टोरी पार्ट टू’ या चित्रपटाचे पाच मोफत शो आयोजित करण्यात आले. या उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळून पहाटेपासूनच सर्व शो हाऊसफुल्ल झाले.
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ड. चैतन्यबापू देशमुख यांनी या उपक्रमाची दखल घेत, ड.ठाकूर यांना पद्म पुरस्कारासाठी राज्यपालांमार्फत शिफारस करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. संत बाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते पहिल्या शोचे उद्घाटन करण्यात आले. पिव्हीआर सिनेमा येथे भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल आणि अमरनाथ यात्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 7 ते 2 दरम्यान विविध स्क्रीनवर पाच शो सादर करण्यात आले. या वेळी मुलींचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरला. कार्यक्रमात मुलींचे पारंपरिक औक्षण करून स्वागत करण्यात आले. घोषणांनी दुमदुमलेले वातावरण, पुष्पवृष्टी आणि आकर्षक रांगोळी यामुळे कार्यक्रमाला सांस्कृतिक रंगत लाभली. ‘लव्ह जिहाद’ विरोधात सजग राहण्याची घेतलेली शपथ हा सर्वात प्रभावी क्षण ठरला. चित्रपट पाहताना अनेक मुली व महिलांना भावनिक आवेग अनावर झाल्याचे दिसून आले. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शोचे उद्घाटन करण्यात आले तसेच उपक्रमासाठी सहकार्य करणार्‍या अनेक कार्यकर्त्यांचा सत्कारही करण्यात आला. सूत्रसंचालन धीरज स्वामी यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेशसिंह ठाकूर यांनी केले. या उपक्रमामुळे मुलींमध्ये सामाजिक भान, सांस्कृतिक मूल्ये आणि जागरूकतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचल्याची भावना व्यक्त होत असून, ड.दिलीप ठाकूर यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

COMMENTS