नवी दिल्ली : इस्रायल आणि अमेरिका हे दोन स्वतंत्र देश आहेत. हे दोन्ही देश आपापल्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने काम करतात. अमेरिकेत लोक म्हणतात,

नवी दिल्ली : इस्रायल आणि अमेरिका हे दोन स्वतंत्र देश आहेत. हे दोन्ही देश आपापल्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने काम करतात. अमेरिकेत लोक म्हणतात, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे मी सांगेन तेच करतात. तर इस्रायलमधील काही मंडळींना वाटते की, ट्रम्प म्हणतात, त्या प्रमाणे मी काम करतो. मात्र, या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. आपण ट्रम्प यांच्या इशाऱ्यावर काम करत नाही. आपण स्वतंत्र आणि स्वाभिमानी देशाचे नेते आहोत,” असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी, ट्रम्प यांच्यासोबतच्या संबंधांवरून होण्याऱ्या चर्चेवर भाष्य करताना म्हटले आहे. ते जेरुसलेममधील ‘जेएनएस समिट’ला संबोधित करत होते.
यावेळी नेतन्याहू यांनी इस्रायलच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले. अनेकदा अमेरिका आणि इस्रायलचे मत सारखेच असते, तर कधी भिन्न असते. मात्र,आम्ही एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा, नेतृत्वाचा आणि जनतेप्रती असलेल्या वचनबद्धतेचा आदर करतो. जेएनएस शिखर परिषदेत नेतन्याहू यांनी दावा केला की, अमेरिकेसोबत मिळून इस्रायली सैन्याने इतिहासातील सर्वात मोठी हवाई मोहीम राबवली आणि इराणच्या अणू संरचनेचे मोठे नुकसान केले. दरम्यान आम्ही केवळ इराणवरच हल्ला केला नाही, तर इराणचे दहशतवादी तळही नष्ट केले.
दरम्यान, स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या अमेरिका-इराण शांतता चर्चेचा उल्लेख करत नेतन्याहू म्हणाले, चर्चेचा परिणाम काहीही असो, आपण इराणला कधीही अण्वस्त्र मिळवू देणार नाही. तसेच, जोवर आवश्यकता वाटेल तोवर, नागरिकांच्या सुरक्षेसाठी इस्रायली सैन्य दक्षिण लेबनानमधील सुरक्षा क्षेत्रात तैनात राहील.
एवढेच नाही तर, इस्रायलचा वाद इराण समर्थित हिजबुल्लाह समूहाशी आहे, लेबनानशी नाही. जर हिजबुल्लाहने इस्रायलच्या सुरक्षेला धोका निर्माण करणे बंद केले, तर लेबनानसोबत शांततेचा मार्ग प्रशस्त होऊ शकतो, असेही नेतन्याहू यांनी म्हटले आहे.

COMMENTS