Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ट्युशन परिसरात टवाळखोरांचा उच्छाद; विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

नांदेड :नांदेड शहरातील ट्युशनसाठी ओळखल्या जाणार्‍या बाबानगर, श्रीनगर, टिळक नगर,आनंदनगर, श्याम नगर,वसंतनगर आणि शाहूनगर या भागांमध्ये टवाळखोर तरुणा

“यदा यदा ही धर्मस्य”..सरकार बलात्कारांच्या घटनांवर सरकार कठोर भूमिका घेणार आहे का नाही?
जनावरे चोरी करणार्‍या तिघांना अटक, बोलेरोसह 4.15 लाखांचा मुद्देमाल जप्त
भाजपचे शुभेंदू अधिकारी यांच्या पीएची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या; राजकीय युद्ध पेटण्याची शक्यता!
टवाळखोरांचा विद्यार्थिनींना त्रास Pune Marathi News | Trouble harasses the  girl students | Latest Pune News at Lokmat.com

नांदेड :
नांदेड शहरातील ट्युशनसाठी ओळखल्या जाणार्‍या बाबानगर, श्रीनगर, टिळक नगर,आनंदनगर, श्याम नगर,वसंतनगर आणि शाहूनगर या भागांमध्ये टवाळखोर तरुणांचा वाढता त्रास गंभीर स्वरूप धारण करत असून विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नंबर प्लेट नसलेल्या दुचाकींवर ट्रिपल सीट फिरत बेधडक वाहन चालवणे आणि विद्यार्थिनींची छेड काढणे, अशा घटना सातत्याने घडत असल्याची तक्रार समोर येत आहे.
संध्याकाळच्या वेळेत या परिसरात ट्युशन क्लासेसमुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची वर्दळ असते. याच वेळेत काही टुकार तरुण गटाने एकत्र येऊन बेफाम वेगात दुचाकी चालवत विद्यार्थिनींना उद्देशून अश्लील हावभाव, कमेंट्स करत असल्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काहींनी तर ट्युशनला जाणे टाळण्यास सुरुवात केली आहे. या घटनांमुळे पालकांमध्येही तीव्र चिंता व्यक्त होत आहे. मुलींना सुरक्षित वातावरण मिळत नसेल, तर शिक्षणावर परिणाम होणारच, अशी भावना पालकांनी व्यक्त केली. परिसरात पोलीस गस्त वाढवावी आणि अशा टवाळखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, या भागात दामिनी पथक आणि चिडीमार पथकासह महिला पोलीस तैनात असतानाही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची टीका होत आहे. पोलीस केवळ पाहत उभे राहतात, पण कारवाई करण्यास टाळाटाळ करतात, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर त्वरित कारवाई, सीसीटीव्ही देखरेख वाढवणे आणि नियमित गस्त आवश्यक आहे. तसेच शाळा व ट्युशन क्लासेसच्या वेळेत विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. एकीकडे बेटी बचाओ, बेटी पढाओ सारख्या घोषणांचा प्रचार केला जात असताना, प्रत्यक्षात विद्यार्थिनींच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने कठोर पावले उचलली नाहीत, तर नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

COMMENTS