Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाचगणी येथील टेबल लॅण्ड पठारावर वीज पडून तीन घोड्यांचा मृत्यू

पाचगणी / वार्ताहर : गुरुवारी दुपारी महाबळेश्‍वर तालुक्यातील पाचगणी येथे विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसादरम्यान अचानक विज पडल्याने झाडाच्या आडो

म्हसवड पोलिसांकडून वाहनधारकांविरोधात दंडात्मक कारवाई
पुस्तकांचे गाव भिलार पाठोपाठ महाबळेश्‍वर तालुक्यातील मांघर होणार पहिले मधाचे गाव
वातावरणाच्या बदलामुळे दुध उत्पादनात घट

पाचगणी / वार्ताहर : गुरुवारी दुपारी महाबळेश्‍वर तालुक्यातील पाचगणी येथे विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसादरम्यान अचानक विज पडल्याने झाडाच्या आडोशाला थांबलेल्या तीन घोड्यांचा मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या मुसळधार पाऊस चालू झाला असता झाडाखाली स्टॉलच्या समोर व आडोश्याला थांबलेल्या घोड्यांवर वीज पडून तीन घोडी जागीच ठार झाल्याची घटना आज गुरुवार (दि.20) पाचगणी टेबल लँन्ड पठारावर दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. घोडे व्यावसायिक झाडापासून दूर असल्याने बचावले.
पाचगणी शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून आज दुपारी साडेतीनच्या सुमारास विजांच्या कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला. जोरदार पडणार्‍या पावसामुळे काही घोडे व्यावसायिकांनी आपली घोडी झाडालगत असणार्‍या स्टॉल समोर व आडोशाला बांधून सदर व्यावसायिक दुसर्‍या स्टॉलमध्ये थांबले. यावेळी जोरदार वीज यात वीज कोसळल्याने तीन घोडी जागीच ठार झाली. ऐन दिवाळी हंगामाच्या तोंडावर घोड्यांचा मृत्यू झाल्याने घोडे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. या घटनेत शंकर गायकवाड, संभाजी दामगुडे, सुनील कांबळे यांचे अंदाजे चार ते साडेचार लाखांचे नुकसान झाले आहे.

COMMENTS