शेवगाव : शेवगाव तालुक्यातील शेवगाव-नेवासा मार्गावर शेवगाव शहरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या ढोरा नदीपात्रातील पाण्यात सोमवारी (दि. १

शेवगाव : शेवगाव तालुक्यातील शेवगाव-नेवासा मार्गावर शेवगाव शहरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या ढोरा नदीपात्रातील पाण्यात सोमवारी (दि. १०) दुपारी १२ वाजेच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.
मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. यानंतर शेवगाव पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला.
मृताची अद्याप ओळख पटलेली नसून, त्याबाबत शेवगाव पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. आपल्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती अथवा जवळचा मित्र बेपत्ता असल्यास नागरिकांनी शेवगाव पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मृताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

COMMENTS