Homeताज्या बातम्या

आजारपणाला कंटाळून माय-लेकाची आत्महत्या; नागपूरच्या जलालपुरा परिसरातील दुर्दैवी घटना

नागपूर: नागपूरच्या जलालपुरा परिसरात कर्करोगाला आणि गंभीर आजारपणाला कंटाळून ५२ वर्षीय आई अमया अनंता कानखोजे आणि त्यांचा ३३ वर्षांचा मुलगा अद्वैत क

लावणी कलाकारांना शासनाने अनुदान द्यावे; लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची राज्य सरकारकडे मागणी
रुग्णालयात तोडफोड; तिघांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कुंभमेळ्याच्या २२७० कोटींच्या निधीमध्ये कोट्यवधींची लूट; मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमावी
चार वर्षांच्या बालकाला विषारी औषध पाजून आईचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi  News | Woman Allegedly Commits Suicide After Poisoning Her Sons - Latest  Pune News at Loksatta.com

नागपूर: नागपूरच्या जलालपुरा परिसरात कर्करोगाला आणि गंभीर आजारपणाला कंटाळून ५२ वर्षीय आई अमया अनंता कानखोजे आणि त्यांचा ३३ वर्षांचा मुलगा अद्वैत कानखोजे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमया कानखोजे या रेल्वेत अनुकंपा तत्त्वावर कार्यरत होत्या आणि त्या ब्रेस्ट कॅन्सरने (स्तनाचा कर्करोग) ग्रस्त होत्या. तर त्यांचा मुलगा अद्वैत हा गंभीर आजारपणामुळे शय्याग्रस्त होता. जलालपुरा येथील ‘श्री गुरु माऊली अपार्टमेंट’मध्ये राहणाऱ्या कानखोजे कुटुंबाचा शेजाऱ्यांशी फारसा संपर्क नव्हता.

अमया यांचा दुसरा मुलगा यश हा हैदराबाद येथे राहतो. मंगळवारी यशने आईला वारंवार फोन केला, मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्याला संशय आला. त्यानंतर त्याने शेजाऱ्यांना व पोलिसांना संपर्क साधला असता ही घटना उघडकीस आली. माय-लेकाच्या या टोकाच्या निर्णयामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

COMMENTS