Homeताज्या बातम्या

आ. पाचपुतेंच्या जनता दरबारात विविध समस्यांची सोडवणूक

श्रीगोंदा : मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या आणि अडचणी सोडविण्यासाठी आयोजित करण्यात येणारा आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांचा मासिक जनता दरब

अ‍ॅड. यदुपत अर्धापूरकर यांना ‘डॉ. अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर; १ ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये होणार वितरण
शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी आज होणार जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
राज्यात पुढील ४८ तासांत पावसाचा जोर वाढणार! पुणे, मराठवाडा व विदर्भासाठी सतर्कतेचा इशारा

श्रीगोंदा : मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या आणि अडचणी सोडविण्यासाठी आयोजित करण्यात येणारा आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांचा मासिक जनता दरबार अखेर नेहमीप्रमाणे त्यांच्या ‘माऊली’ संपर्क कार्यालय व निवासस्थानी पार पडला. या जनता दरबाराच्या ठिकाणावरून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत, तो आमदारांच्या निवासस्थानी भरवू नये अशी भूमिका घेतली होती. मात्र या विरोधानंतरही जनता दरबार माऊली येथेच आयोजित करण्यात आला. त्यामुळे आता विरोध करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी श्रीगोंदा शहरातील माऊली संपर्क कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमाच्या माध्यमातून मतदारसंघातील नागरिकांना आपल्या समस्या थेट आमदारांसमोर मांडण्याची संधी मिळते.

सोमवारी झालेल्या जनता दरबाराला मतदारसंघातील विविध गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. अनेकांनी महसूल, वीज, पाणी, रस्ते, शासकीय योजनांचा लाभ, विविध दाखले, प्रलंबित प्रशासकीय कामे तसेच स्थानिक विकासाशी संबंधित प्रश्न मांडले.

आ. पाचपुते यांनी प्रत्येक नागरिकाशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी तात्काळ चर्चा करून अनेक प्रश्नांबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. काही प्रकरणांमध्ये त्वरित पाठपुरावा करण्याचे आदेश देत नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी आमदार पाचपुते म्हणाले, “जनता दरबाराचा मुख्य उद्देश म्हणजे मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला आपली समस्या थेट लोकप्रतिनिधीसमोर मांडण्याची संधी मिळावी आणि त्या प्रश्नांवर तातडीने पाठपुरावा व्हावा. प्रत्येक नागरिकाचा प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचवून तो प्रामाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न करणे, ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे.”

COMMENTS