कोपरगाव : आर्थिक शिस्त पाळून पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार सहकारी पतसंस्थेने केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. सभासदांच्या हिताला सदैव प्राधान्य, पंध

कोपरगाव : आर्थिक शिस्त पाळून पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार सहकारी पतसंस्थेने केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. सभासदांच्या हिताला सदैव प्राधान्य, पंधरा टक्के लाभांश देण्याचा निर्णय आणि ठेवीत झालेली बावीस टक्क्यांची वाढ या बाबी संस्थेच्या कामगिरीचे वैशिष्ट आहे असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.
कोळपेवाडी येथे, संस्थेच्या ३७ व्या वार्षिक सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक माजी आ. अशोकराव काळे, संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र रोहमारे, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे, संचालक दिलीपराव बोरनारे आदि मान्यवर उपस्थित होते.
आ.आशुतोष काळे म्हणाले, या संस्थेने कर्मवीर शंकरराव काळे यांचा वारसा जपत सभासदांच्या विश्वासाला प्राधान्य दिले. संस्थेकडे ५३.२४ कोटी रूपयांच्या ठेवी असून ४० कोटी ६८ लाख कर्ज वाटप केले आहे. ढोबळ एनपीए ३.५२ टक्के असून एनपीए च्या व्याज व मुद्दलासाठी ०८ कोटी ६३ लाख ८५ हजाराची गुंतवणूक केली आहे. शंभर टक्के तरतुदीमुळे निव्वळ एन.पी.ए.०% आहे. १ कोटी १४ लाख ३० हजार रुपयांचा नफा झाला.
याप्रसंगी शरद पवार पतसंस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे, व्हाईस चेअरमन रावसाहेब चौधरी, गौतम सहकारी कुक्कुट पालनचे चेअरमन विजय कुलकर्णी, बँकेचे सर्व संचालक मंडळ व व्यवस्थापन मंडळ सदस्य, गौतम बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे, प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे, आदी मान्यवर उपस्थित होते. पतसंस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे यांनी आभार मानले.

COMMENTS