Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धीरज परदेशी हत्या प्रकरणाचा जिल्हाभर निषेध; शेवगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

शेवगाव : मुकुंदनगर परिसरात काम करत असताना झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या हिंदू युवक धीरज परदेशी यांच्य

मानव कितीही प्रगतीच्या शिखरावर असला तरी निसर्गाला आव्हान देऊ नये: राहुल मोरे; जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त संदेश
११ वी उत्तीर्ण खंडित विद्यार्थ्यांना १२ वीत प्रवेश मिळावा; बीड जिल्हा ‘मुप्टा’ शिक्षक संघटनेची मागणी
नांदेड जिल्हा बँक निवडणुकीत राजूरकरांची ’चाणक्यनीती’ ठरली निर्णायक? संगीता डक पाटील यांच्या विजयाची शहरात राजकीय चर्चा
वंचित बहुजन आघाडी शेवगाव Archives - Lokmanthan | लोकमंथन

शेवगाव : मुकुंदनगर परिसरात काम करत असताना झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या हिंदू युवक धीरज परदेशी यांच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने सोमवारी शेवगाव बंदची हाक देण्यात आली. या बंदला व्यापारी, व्यावसायिक तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने शेवगाव शहरातील बाजारपेठ व व्यावसायिक व्यवहार शंभर टक्के बंद राहिल्याचा दावा सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आला.

धीरज परदेशी हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करावी, हत्येमागील सूत्रधार तसेच मास्टरमाइंडचा शोध घ्यावा आणि दोषींवर पुराव्यांच्या आधारे कठोर कायदेशीर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी बंद पुकारण्यात आला होता.

सकल हिंदू समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील विविध भागांतील दुकाने व व्यावसायिक आस्थापना बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या शेवगाव शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये दिवसभर शांतता पाहायला मिळाली. नागरिकांनी शांततेच्या मार्गाने बंद पाळत प्रशासनाला सहकार्य केले.

दरम्यान, सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात धीरज परदेशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून, हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व आरोपींचा शोध घेऊन निष्पक्ष, सखोल व पारदर्शक तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.

धीरज परदेशी यांना न्याय मिळावा आणि दोषींवर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, ही सकल हिंदू समाजाची प्रमुख मागणी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

COMMENTS