कोपरगाव शहर : केंद्र व राज्य शासनाने पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण २० ते २५ टक्क्यांपर्यंत करण्याचे धोरण राबविले आहे. मात्र, इथेनॉल मिश्रणामुळे वा

कोपरगाव शहर : केंद्र व राज्य शासनाने पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण २० ते २५ टक्क्यांपर्यंत करण्याचे धोरण राबविले आहे. मात्र, इथेनॉल मिश्रणामुळे वाहनांच्या इंजिनवर परिणाम होऊन वाहनचालकांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने तहसीलदारांकडे सोमवारी (दि. १०) निवेदनाद्वारे केली आहे.
कोपरगाव तालुका प्रमुख श्रीरंग चांदगुडे व शहर प्रमुख गगन हाडा यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तसेच संबंधित कामगार घटकांना इथेनॉल निर्मितीचा मोठा फायदा होतो. देशाच्या ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढविण्यास केंद्र व राज्य शासनाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र, इथेनॉल निर्मितीच्या धोरणामुळे साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी उपलब्ध कच्च्या मालाचे नियोजन व कारखान्यांच्या आर्थिक व्यवहारात अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
इथेनॉल मिश्रणामुळे वाहनांच्या इंजिनमध्ये बिघाड होणे, वाहनांची देखभाल व दुरुस्तीचा खर्च वाढणे तसेच वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणे, अशा समस्या निर्माण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
यावेळी, तालुका प्रमुख श्रीरंग चांदगुडे, शहरप्रमुख गगन हाडा, उपजिल्हाप्रमुख संजय ढवळे, उपजिल्हाप्रमुख असलम शेख, तालुका संघटक बाळासाहेब जाधव, शेतकरी सेना तालुकाप्रमुख धर्माभाऊ जाजवे, विधानसभा प्रमुख विवेक कुलकर्णी, युवा सेना प्रमुख विजय गोर्डे, तालुका प्रमुख गंगाधर राहणे, भावेश थोरात, विठ्ठल निकम, विष्णू वाबळे आदी शिवसैनिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

COMMENTS