Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आपण पवार कुटुंबियासोबतच राहणार

आमदार नीलेश लंके ः संदिग्ध भूमिकेमुळे कार्यकर्ते संभ्रमात

पारनेर/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडली असून, कोण शरद पवारांसोबत आहे, आणि कोण अजित पवारांसोबत आ

सुसंस्कारी पिढी घडविण्याचे कार्य वाचनालयाच्या माध्यमातून होणार -आ. निलेश लंके
शिवपुत्र संभाजी महानाट्याचा राजकारणाशी संबंध नाही
निर्यातबंदी हटली तरीही कांद्याचे भाव का कोसळले ?

पारनेर/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडली असून, कोण शरद पवारांसोबत आहे, आणि कोण अजित पवारांसोबत आहे, यासंदर्भातील आढावा पक्षाकडून घेण्यात येत आहे. आमदार देखील आपल्या मतदारसंघात जावून मतदारांशी चर्चा करून भूमिका स्पष्ट करत आहे. पारनेरमध्ये आमदार निलेश लंके यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर आपण पवार कुटुंबियांसोबत असल्याचे जाहीर केले. मात्र आपण अजित पवारांसोबत जाणार की, शरद पवारांसोबत राहणार ही भूमिका आमदार लंके यांनी गुलदस्त्यातच ठेवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने पारनेर येथील आनंद लॉन येथे घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी बोलतांना आमदार लंके म्हणाले की, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. सध्याच्या घडामोडी पाहता आपण राजकारण सोडून द्यावे की काय अशी अवस्था झाली आहे. राजकारण अभिमन्यू सारखे झाले असून हा परिवार एक राहिला पाहिजे. हा परिवार महाराष्ट्राचे हित जपणारा व विकासाला दिशा देणारा आहे. त्यामुळे मला काही मिळाले नाही तरी चालेल; परंतु महाराष्ट्र, देशाच्या हितासाठी पवार कुटुंबिय राजकारणात राहिले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजकारणात आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आहोत. राष्ट्रवादी हा परिवार आहे, हा परिवार सक्षम असून खासदार शरद पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, अजित पवार यांच्या बरोबर असून राजकारणात कुठलाही निर्णय घेतला तरी मान्य होतो की नाही यावर प्रश्‍नचिन्ह आहे. सोशल मीडियावर अनेक मतांतर येत आहेत. आपण पवार कुटुंबिया बरोबर आहोत, त्यामुळे कुटुंबात काही निर्णय घेता येत नाही. हा परिवार आहे. मतदार संघाचा फायदा असे पायाजवळ न पाहता पुढील 10 वर्षे त्याचा फायदा झाला पाहिजे. अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केली आहे. राजभवनात शपथविधीला गेलो असता जे काही चालले आहे ते धक्कादायक होते. नेता कुठलाही निर्णय घेत असताना काही उद्देश व संदर्भ असतो. त्यामुळे गेल्या तीन ते चार वर्षांत घट्ट नाते या कुटुंबियांशी झाले आहे. या तिघांचे प्रेम व नाते माझ्या बरोबर असल्याचे आमदार लंके यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीसाठी तयार राहा – आमदार लंके म्हणाले, काही दिवसांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लागु शकतात. त्यामुळे रात्रीतून काही होवू शकते, हे राजकीय घडामोडीतून दिसून येत आहे. बुथ कमिटी ही सर्वच निवडणुकीसाठी महत्त्वाची आहे. आपल्या तालुयाचा व मतदारसंघाचा पाया भक्कम केला पाहिजे. याचा फायदा प्रत्येक निवडणुकीत होईल. मतदारसंघात 365 बुथ असून प्रत्येकाचा अभ्यास केला आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी कोणत्याही प्रकारची निवडणूक लागली तरी सामोरे जाता आले पाहिजे. त्यामुळे तयारीत राहा असा संदेशच त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

COMMENTS