Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड न.प. कर्मचारी शिलाबाई शिंतोडे सेवानिवृत्त39 वर्षांच्या प्रामाणिक व निष्ठावान सेवेला मानाचा मुजरा

बीड : बीड नगरपालिकेत तब्बल 39 वर्षे प्रामाणिकपणे व कर्तव्यदक्षतेने सेवा बजावलेल्या शिलाबाई मारुती शिंतोडे या कर्मचारी 31 मार्च 2026 रोजी से

यशोदीप गुरुकुलमध्ये तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचा जल्लोष; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
बीडमध्ये मेडीकलच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
शिक्षकांना एसआयआरच्या कामातून मुक्त करा; विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी तडजोड नकोजिल्हाधिकार्‍यांना सामाजिक कार्यकर्त्यांचे निवेदन; सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

बीड : बीड नगरपालिकेत तब्बल 39 वर्षे प्रामाणिकपणे व कर्तव्यदक्षतेने सेवा बजावलेल्या शिलाबाई मारुती शिंतोडे या कर्मचारी 31 मार्च 2026 रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी विविध विभागांमध्ये जबाबदारीची कामे पार पाडत आपल्या कार्याची वेगळी छाप उमटवली. त्यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी नगरपालिकेच्या वतीने त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी उपमुख्याधिकारी उमेश दुधाळ यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन शिलाबाई शिंतोडे यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला सम्राट कदम, रोहिटे साहेब, सिद्धांत वडमारे, अक्षय वडमारे, कपिल इनकर यांच्यासह नगरपालिकेतील अनेक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिलाबाई शिंतोडे यांनी आपल्या दीर्घ सेवाकाळात प्रामाणिकपणा, शिस्तबद्धता आणि कर्तव्यनिष्ठा यांचे उत्तम उदाहरण घालून दिले. त्यांनी काम करताना नेहमीच जबाबदारीची जाणीव ठेवत नागरिकांच्या कामांना प्राधान्य दिले. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे त्या सहकार्‍यांमध्ये लोकप्रिय तर होत्याच, पण नागरिकांमध्येही त्यांना विशेष आदराचे स्थान मिळाले. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी त्यांच्या सेवाभावाचा गौरव करत त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. अनेक सहकार्‍यांनी त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य व आनंदी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शिलाबाई शिंतोडे यांनीही आपल्या भावना व्यक्त करत नगरपालिकेतील सर्व अधिकारी व सहकार्‍यांचे सहकार्याबद्दल आभार मानले. या दीर्घ प्रवासात मिळालेल्या अनुभवांचा उल्लेख करत त्यांनी काम करताना मिळालेल्या समाधानाची भावना व्यक्त केली. एकूणच, 39 वर्षांच्या निष्ठावान सेवेनंतर शिलाबाई शिंतोडे यांच्या सेवानिवृत्तीचा हा क्षण भावनिक आणि अभिमानास्पद ठरला.

COMMENTS