Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशी बनावटीचे पिस्तूल खरेदी-विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश; विकणार्‍यासह खरेदी करणारे सातारा जिल्ह्यातील तिघे अटकेत

सोलापूर : घरफोडीतील गुन्हेगार प्रविण राजा शिंदे (रा. वडुज, ता. खटाव ) हा देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन सोलापुरात आल्यानंतर त्याला एमआयडीसी पोलिसांनी

विवाहित प्रेयसीसाठी बुरखा घालणार्‍या प्रियकरास चोर समजून बदडले
प्लास्टिकचा कचरा उघड्यावर फेकणार्‍याविरोधात कारवाई करा : पालकमंत्री शंभूराज देसाई
४०० फूट खोल दरीत कोसळणारी कार झाडावर अडकली l LokNews24

सोलापूर : घरफोडीतील गुन्हेगार प्रविण राजा शिंदे (रा. वडुज, ता. खटाव ) हा देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन सोलापुरात आल्यानंतर त्याला एमआयडीसी पोलिसांनी एसव्हीसीएस प्रशालेसमोर सापळा रचून मोठ्या शिताफीने पकडले. क्रेझ म्हणून प्रविण शिंदेकडून पिस्तूल विकत घेणार्‍यांना कराड, सातारा व माण तालुक्यातील तिघांना पोलिसांनी सातारा जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. ते चौघेही सध्या पोलिस कोठडीत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रविण शिंदे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर अनेक घरफोडी, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. चोरी, घरफोडी करताना त्याने देशी बनावटी पिस्तूल स्वस्तात विकत घेऊन ज्यादा पैशाने विकण्याचा व्यवसाय सुरु केला होता. मध्य प्रदेश मधून 20 ते 25 हजार रुपयाला पिस्तूल विकत घेऊन तो सातारा जिल्ह्यातील लोकांना विकत होता. दरम्यान, प्रविण शिंदे हा 12 जून रोजी सोलापूर जिल्ह्यातील एका तरूणाला पिस्तूल विकायला येणार असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अक्कलकोट रोडवरील एसव्हीसीएस प्रशालेसमोर सापळा रचला. खबर्‍याने दिलेल्या माहितीनुसार प्रविण शिंदे हा दुचाकीवरून आला. त्याचवेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीची पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस आढळून आली. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अधिक तपासादरम्यान त्याने आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील तिघांना अशी तीन पिस्तूल विकली असल्याचे स्पष्ट झाले.
सपोनि रोहित चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हवालदार राकेश पाटील, पोलीस नाईक चेतन रूपनर, सचिन भांगे, मंगेश गायकवाड, अय्याज बागलकोटे, पोलिस शिपाई अश्रुभान दुधाळ, अमोल यादव, किशोर व्हनगुंटी, सचिनकुमार जाधव, काशीनाथ वाघे, शैलेश स्वामी, शंकर याळगी, इकरार जमादार यांच्या पथकाने त्या तिघांचा शोध घेतला.
पिस्तूल विकत घेणार्‍या सातारा जिल्ह्यातील तिघे पोलीस कोठडीत
घटनेचे गांभीर्य ओळखून एमआयडीसी पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण पथक सातार्‍याला रवाना झाले. या पथकाने पोलीस आयुक्त राजेंद्र माने, उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित आरोपींचा शोध घेतला. त्यांनी स्वरूप विजय पाटील (रा. तांबवे, ता. कराड), अमोल उर्फ पप्पू विलास खरात (रा. दहिवडी, ता. माण) आणि ओंकार उर्फ रावडी जालींदर देशमुख (रा. सातारा) यांना पकडले.

COMMENTS