Homeताज्या बातम्या

नांदेड शहर पुन्हा एकदा हादरले; वाघी रोड परिसरात तरुणाची निर्घृण हत्या, तलवारीने सपासप वार करत गोळीबार

नांदेड शहर पुन्हा एकदा एका थरारक खुनाच्या घटनेने हादरले असून, वाघी रोड परिसरात रविवारी मध्यरात्रीनंतर एका 35 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार

आरोपींच्या घरावर जेसीबी चालवणारगुन्हेगारांना मुभा नाही; शिर्डी खून प्रकरणात माजी खा. विखेंचा इशारा
कर्जत शहरातील गुंडगिरी मोडून काढाव्यापारी असोसिएशनचे पोलिसांना निवेदन
त्रिपुराच्या डीजीपीचा कार्यालयात आढळला मृतदेह



नांदेड शहर पुन्हा एकदा एका थरारक खुनाच्या घटनेने हादरले असून, वाघी रोड परिसरात रविवारी मध्यरात्रीनंतर एका 35 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेख शमीम (वय 35) हा आपल्या काही मित्रांसोबत वाघी रोड परिसरातील एका दुकानासमोर बसून गप्पा मारत होता. पहाटे सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या चार ते पाच अज्ञात युवकांनी त्याच्याकडे एका ठिकाणाचा पत्ता विचारला. शेख शमीम त्यांना पत्ता सांगत असतानाच आरोपींनी अचानक तलवार आणि इतर धारदार शस्त्रे काढून त्याच्यावर जीवघेणा हल्ला चढविला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. आरोपींनी शेख शमीमवर सपासप वार करत त्याला गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता हल्लेखोरांनी गोळीबारही केल्याची माहिती समोर आली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शेख शमीमला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसराची नाकाबंदी करून हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात खुनामागील कारण स्पष्ट झालेले नसून, जुने वैमनस्य, आर्थिक व्यवहार किंवा अन्य कोणत्या कारणातून ही घटना घडली का, याचा तपास पोलीस करत आहेत. शहरात काही दिवसांपासून वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर वाघी रोडवरील या हत्येने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली आहेत.

COMMENTS