Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिंपळनेर सर्कलमधील युवा पोलीस दलात; शिवसेना माजी जिल्हाप्रमुखांनी केला सत्कार

बीड : पिंपळनेर सर्कल मधील होतकरू तरुणांनी पोलीस दलात उल्लेखनीय यश संपादन करत परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. यानिमित्ताने शिवसेना माजी जिल्हाप्रमु

पाटोदा तालुक्यात सोलार प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसादकेंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशी नवी दिल्लीत सविस्तर चर्चा
बीड शहरातील नागसेन बुद्ध विहारात बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना व अनावरण सोहळा 13 एप्रिल रोजी
श्रीरामनवमी निमित्त संगीतमय सुन्दरकाण्ड चे आयोजन

बीड : पिंपळनेर सर्कल मधील होतकरू तरुणांनी पोलीस दलात उल्लेखनीय यश संपादन करत परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. यानिमित्ताने शिवसेना माजी जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते सर यांनी श्री जगदंबा पेट्रोलियम, बाभळवाडी येथे या यशस्वी तरुणांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. मौजे ईट येथील दत्तात्रयजी डोईफोडे यांचे चिरंजीव विकास डोईफोडे तसेच मौजे पिंपळादेवी येथील सखारामजी कानडे यांचे चिरंजीव माऊली कानडे यांची अमरावती पोलीस दलात निवड झाली.
तसेच मौजे केसापुरी (परभणी) येथील विठ्ठल अवधूत कवचट यांची बीड पोलीस दलात तर मौजे पिंपळनेर येथील पांडुरंग रामप्रसाद नरवडे यांची लातूर पोलीस दलात निवड झाल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करण्यात आले. मौजे पिंपळनेर येथील कु.शितल अवधूत गवळी या तरुणीची सुद्धा बीड पोलीस दलात निवड झाली आहे. या पाचही तरुण/तरुणींनी ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामागे कुटुंबियांचे, विशेषतः वडिलांचे मार्गदर्शन व पाठबळ महत्त्वाचे ठरले असल्याचे परमेश्वर सातपुते सर यांनी यावेळी सांगितले. मुलांच्या यशामुळे त्यांच्या कुटुंबियांची मान उंचावली असून हा संपूर्ण पिंपळनेर सर्कलसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी सोबत केसापुरी (परभणी) येथील सरपंच महेशजी शिंदे, माजी सरपंच बाबासाहेब भाऊ कवचट, लक्ष्मण दादा कवचट, युवानेते अजय भैय्या शिंदे, शामजी काकडे, राजाभाऊ नरवडे, भागवतजी कदम, सतीश भाऊ इतापे, अंकुश भाऊ सातपुते, सनराईज इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वर सातपुते सर, तसेच जालिंदर बप्पा कवचट, मुकुंदजी कवचट, बाळासाहेब कवचट, पप्पू कवचट, हनुमान दाजी निर्धार, नंदकुमार चौरे, ज्ञानेश्वरजी गिरी, पांडुरंगजी घुमरे, सखारामजी जाधव, दत्ता पवार, पप्पू भटे, बाबूराव सातपुते, केशव निर्धार, गणेश सातपुते, राकेश ढोले यांच्यासह अनेक गावकरी व सहकारी उपस्थित होते.

COMMENTS