बीड : मेरा युवा भारत अंतर्गत युवक खेळ मंत्रालय, भारत सरकार आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उत्साहात आयोजन कर्मयोगी डॉक्टर भाऊसाहेब शिंदे शि

बीड : मेरा युवा भारत अंतर्गत युवक खेळ मंत्रालय, भारत सरकार आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उत्साहात आयोजन कर्मयोगी डॉक्टर भाऊसाहेब शिंदे शिक्षण संस्था संचलित यशोदीप गुरुकुल, बीडच्या प्रांगणावर करण्यात आले. या स्पर्धांमध्ये विविध गुरुकुलांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
या क्रीडा स्पर्धांमध्ये जीवनसंस्कार गुरुकुल, रायसेना गुरुकुल, आनंदी गुरुकुल, स्वप्नपूर्ती गुरुकुल आणि यशोदीप गुरुकुल या पाच संघांनी सहभाग घेत स्पर्धेला रंगत आणली. मुलांच्या गटात कबड्डी, 100 मीटर धावणे आणि गोळा फेक अशा स्पर्धा पार पडल्या. 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत यशोदीप गुरुकुलचा सुरज सतीश चौधरी याने प्रथम क्रमांक पटकावला. योगेश सुरेश आंधळे याने द्वितीय तर विराट राजेंद्र पवार याने तृतीय क्रमांक मिळवला. गोळा फेक स्पर्धेत यशराज आडे प्रथम, दिनेश खांडेभराड द्वितीय आणि अमर जाधव तृतीय ठरले. कबड्डी स्पर्धेत एकूण पाच संघांनी सहभाग घेतला असून यामध्ये यशोदीप गुरुकुलने प्रथम क्रमांक मिळवत विजेतेपद पटकावले, तर रायसेना गुरुकुल संघाने द्वितीय स्थान मिळवले. मुलींच्या गटात 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राधिका पंडित खाडे हिने प्रथम क्रमांक मिळवला. अस्मिता अर्जुन चव्हाण हिने द्वितीय तर राधिका अशोक बोंबाळे हिने तृतीय स्थान पटकावले. गोळा फेक स्पर्धेत अस्मिता अर्जुन चव्हाण प्रथम, रागिनी विठ्ठल नागरगोजे द्वितीय आणि आकांक्षा साबळे तृतीय ठरल्या. तसेच मुलींच्या रस्सीखेच स्पर्धेत यशोदीप गुरुकुल संघाने प्रथम क्रमांक मिळवला, तर जीवनसंस्कार गुरुकुल संघाने द्वितीय स्थान मिळवले. या स्पर्धा मेरा युवा भारतचे जिल्हा समन्वयक प्रकाश त्रिभुवन सर, निलेश त्रिभुवन सर तसेच यशोदीप गुरुकुलचे संचालक जालिंदर माने सर, विजयकुमार गिरे, बाबासाहेब पवार, राजेंद्र पवार, दीपक वाघमारे, सौरभ देवडकर, भोसले सर, घाडगे सर, रोहित ढेरे, अरुण आंधळे, संदीप धुमाळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडल्या. स्पर्धेनंतर बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. जिल्हा समन्वयक प्रकाश त्रिभुवन सर यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्रे व पदके प्रदान केली आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी विजय सर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

COMMENTS