Homeताज्या बातम्या

शिक्षकांना एसआयआरच्या कामातून मुक्त करा; विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी तडजोड नकोजिल्हाधिकार्‍यांना सामाजिक कार्यकर्त्यांचे निवेदन; सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

बीड : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेसाठी शिक्षकांची नियुक्ती करून विद्यार्थ्यांच्या नियमित शिक्षणात अडथळा निर्माण केला जात अ

मतदारांनी एस.आय.आर. फॉर्म भरून लोकशाही अधिक सक्षम करावी – शेख फारुख
बीड मतदारसंघातील नागरिकांनी एसआयआर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी-डॉ.योगेश क्षीरसागरमतदार यादीतील नाव कायम ठेवण्यासाठी ‘बीएलओ’ला सहकार्य करण्याचे आवाहन
बीड मतदारसंघातील नागरिकांनी एसआयआर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी-डॉ.योगेश क्षीरसागरमतदार यादीतील नाव कायम ठेवण्यासाठी ‘बीएलओ’ला सहकार्य करण्याचे आवाहन


बीड : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेसाठी शिक्षकांची नियुक्ती करून विद्यार्थ्यांच्या नियमित शिक्षणात अडथळा निर्माण केला जात असल्याचा आरोप करीत, शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून मुक्त करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली.
महा एनजिओ फेडरेशन महाराष्ट्र राज्यचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मा. जिल्हाधिकारी, बीड यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यामध्ये मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) प्रक्रियेसाठी राज्यभरातील शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत असल्याने शाळांमधील नियमित अध्यापनावर विपरीत परिणाम होत असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शिक्षकांचे मूलभूत कर्तव्य विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे आणि शाळेची शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे हे आहे. मात्र निवडणुका, जनगणना, सर्वेक्षण, विविध शासकीय मोहिमा आणि आता एसआयआरसारख्या प्रक्रियांमध्ये शिक्षकांना वारंवार गुंतविल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा अमूल्य वेळ वाया जात आहे. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी शासन विविध योजना राबवत असताना दुसरीकडे शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा टाकला जात आहे. अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असताना उपलब्ध शिक्षकांनाच अतिरिक्त जबाबदार्‍या देण्यात येत असल्याने अभ्यासक्रम पूर्ण करणे, मूल्यमापन, शैक्षणिक उपक्रम आणि गुणवत्तावाढीच्या प्रक्रियेवर परिणाम होत आहे, असे बाजीराव ढाकणे यांनी सांगितले. एसआयआर प्रक्रिया लोकशाहीसाठी महत्त्वाची असली तरी त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ किंवा पर्यायी यंत्रणा उपलब्ध करून देता येऊ शकते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी तडजोड न करता शिक्षकांना अशा कामांतून मुक्त करण्यासाठी शासनाने तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि शाळांमधील अध्यापन अबाधित ठेवावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे असे प्राचार्य डी जी तांदळे यांनी सांगितले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, प्राचार्य डी. जी. तांदळे, लेक लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे, डॉ. संजय तांदळे, युनुस शेख, नितीन सोनवणे, हनुमंत घोडके आदी उपस्थित होते.

COMMENTS