Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीडमध्ये मेडीकलच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

बीड : जिल्ह्यातील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथे पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या 28 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना अंब

ट्युशन परिसरात गुंडगिरीचा थरार; बारावीच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्लालातूरमध्ये उपचार सुरू; प्रकृती चिंताजनक, तिघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात
मांजरमच्या रस्त्यांची चाळण; सांडपाणी, खड्ड्यांनी नागरिक हैराण
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी 90 कोटींचा निधी मंजूर; खा.बजरंग सोनवणेंनी मानले आभार, 15 व्या वित्त आयोगातून जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींचा होणार कायापालट

बीड : जिल्ह्यातील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथे पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या 28 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना अंबाजोगाई परिसरात घडली. मंदार उमेश दाभाडे असे त्यांचे नाव असून ते त्वचारोग विषयाच्या दुसर्‍या वर्षात शिक्षण घेत होते. ते मूळचे पुणे येथील रहिवासी होते. अंबाजोगाई-चनई रोडवरील संत रविदास नगर भागात ते भाड्याच्या घरात राहत होते. प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी पहाटेच्या सुमारास राहत्या खोलीत गळफास घेतला. यापूर्वी त्यांनी घरमालकाला ऑनलाईन पद्धतीने भाडे पाठवले होते तसेच भावाला मोबाईलचा संकेतांकही कळवला होता. घटनास्थळी तपास यंत्रणा आणि न्यायवैद्यकीय पथक दाखल झाले असून मृत्यूचे कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी सुरू आहे.

COMMENTS