Homeताज्या बातम्या

काकू-नाना प्रतिष्ठानतर्फे २३ जुलै रोजी भंडी शेगाव येथे महापंगत; माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर राहणार उपस्थित

बीड: प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही काकू-नाना प्रतिष्ठानच्या वतीने आषाढी वारीनिमित्त वारकर्‍यांसाठी महापंगतीचे आयोजन करण्यात आले आहे. माजी मंत्री तथा प

राजीनामा द्या आणि संघात प्रवेश करा! राज ठाकरेंनी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटलांना फटकारले
प्रकाशकांनी ३० जून पर्यंत वार्षिक विवरणपत्र दाखल करावेत; विवरणपत्र दाखल न केल्यास दहा हजारांचा दंड
अरणगाव येथे रविवारी भव्य रथयात्रा; आषाढी एकादशी व द्वादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
जयदत्त क्षीरसागर यांनी 'राष्ट्रवादी' सोडण्याचं कारण सांगितलं! - Marathi  News | Ncp leader jaydutt kshirsagar told reason behind leaving ncp | TV9  Marathi

बीड: प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही काकू-नाना प्रतिष्ठानच्या वतीने आषाढी वारीनिमित्त वारकर्‍यांसाठी महापंगतीचे आयोजन करण्यात आले आहे. माजी मंत्री तथा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम गुरुवार, २३ जुलै रोजी सकाळी १० वाजता पार पडणार आहे.

श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होत श्रीगुरू रामचंद्र बोधले महाराज संस्थान, डिकसळ येथील ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांच्या नेतृत्वाखाली श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणार्‍या दिंडीतील वारकर्‍यांसाठी पंढरपूर तालुक्यातील भंडी शेगाव येथील लक्ष्मी धाबा येथे महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या महापंगतीला माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर उपस्थित राहून वारकर्‍यांची भेट घेणार आहेत. आषाढी वारीच्या पावन निमित्ताने वारकर्‍यांची सेवा करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत असून, यंदाही मोठ्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन काकू-नाना प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS