Homeताज्या बातम्या

इराणचा अमेरिकेवर बुशेर अणुऊर्जा प्रकल्पाजवळ हवाई हल्ल्याचा आरोप; अमेरिका-इराण तणावामुळे जगाचे टेन्शन वाढले

इराण आणि अमेरिका यांच्यातील लष्करी संघर्ष पुन्हा एकदा कमालीचा पेटला असून दोन्ही देशांकडून एकमेकांवर भीषण हल्ले चढवले जात आहेत. अमेरिकेच्या जॉर्डन

खा. आष्टीकरांवर शिवसेना जिल्हाप्रमुख खराटेंचा घणाघाती हल्ला; राजीनामा देऊन पुन्हा मैदानात येण्याचे खुले आव्हान!
श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे बुधवारी ह.भ.प. पांडुरंग महाराज उगले यांचे कीर्तन; गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
महेश दीक्षित आयबीचे (IB) नवे संचालक; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
जगात उडाला हाहाकार! इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पाजवळ अमेरिकेचा हल्ला? इराणी  अधिकाऱ्याने.. - Marathi News | An Iranian official made major claim that  the US carried out an attack near ...

इराण आणि अमेरिका यांच्यातील लष्करी संघर्ष पुन्हा एकदा कमालीचा पेटला असून दोन्ही देशांकडून एकमेकांवर भीषण हल्ले चढवले जात आहेत. अमेरिकेच्या जॉर्डन येथील लष्करी तळावर इराणने मोठा हल्ला केल्यानंतर अमेरिकेनेही इराणच्या विविध भागांत प्रतिहल्ले केले. या दरम्यान, अमेरिकेने आपल्या बुशेर (Bushehr) अणुऊर्जा प्रकल्पाच्या अत्यंत जवळ हवाई हल्ला केल्याचा खळबळजनक आरोप एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने केला आहे. इराणच्या या दाव्यामुळे जगभरात प्रचंड भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

इराणी सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) इराणवरील हल्ले तात्पुरते थांबवल्याचे जाहीर केल्यानंतर लगेचच दुपारच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. या नवीन हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील झालेला तात्पुरता युद्धविराम (Ceasefire) करार संपुष्टात आला असून युद्ध अधिक घातक व अनियंत्रित वळणावर पोहोचले आहे.

पश्चिम आशियातील अमेरिकन तळांवर इराणचा क्षेपणास्त्र मारा

अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने पश्चिम आशियातील अमेरिकेचे लष्करी तळ आणि त्यांच्या मित्रदेशांना थेट टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. बहरीनमध्ये सलग तीनदा धोक्याचे सायरन वाजले असून, इराणने कुवेत, कतार आणि जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागली आहेत. ज्या ज्या ठिकाणी अमेरिकेची लष्करी उपस्थिती आहे, त्या संपूर्ण क्षेत्राला इराणने लक्ष्य केले आहे.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकणार; भारतासह चीनवर टॅरिफचा धोका

अमेरिका आणि इराणमधील या थेट संघर्षाचे परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत मोठी वाढ नोंदवली जात आहे.

दुसरीकडे, अमेरिकेच्या संसदेत रशियाची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी एक नवे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. या कायद्यांतर्गत रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अमेरिका मोठा आयात कर (Tariff) लादण्याच्या तयारीत आहे. यामध्ये भारत आणि चीनसह इतर काही देशांचा समावेश असल्याने भारतासमोरील आर्थिक व इंधन आव्हाने अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS