Homeताज्या बातम्या

एकजुटीची ताकद दाखवा; ३० जूनच्या महामोर्चात सहभागी व्हा – पुरुषोत्तम (गोटू) वीर

बीड: अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ३० जू

नांदेडमधील कोचिंग क्लासेस व शैक्षणिक संस्थांची सुरक्षा रामभरोसे? लखनौ दुर्घटनेनंतर अग्निसुरक्षा तपासणीची मागणी
कुंडलवाडीच्या भूमिपुत्राची मोठी झेप; सुदर्शन होनवडजकर मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त
व्यवस्थेचा मांडलेला बाजार! शिक्षक पात्रता चाचणी पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ

बीड: अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ३० जून रोजी मुंबई येथे विधिमंडळावर भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चात बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे बीड लोकसभा क्षेत्र प्रमुख व जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम (गोटू) वीर यांनी केले आहे.

वीर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले की, अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाचा निर्णय समाजात फूट पाडणारा असून, घटनात्मक आरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकजुटीने उभे राहणे आवश्यक आहे.

बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते, संघटनांचे पदाधिकारी तसेच आंबेडकर विचारांवर विश्वास ठेवणार्‍या नागरिकांनी मोठ्या संख्येने या महामोर्चात सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले. आपल्या घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणासाठी आणि उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी ३० जूनचा महामोर्चा निर्णायक ठरणार आहे. सर्वांनी एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी ताकद दाखवावी, असे पुरुषोत्तम (गोटू) वीर यांनी म्हटले आहे.

COMMENTS