Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पुणे : कात्रज परिसरात सासरच्या सततच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्

बीडमध्ये मेडीकलच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
हळद लागण्यापूर्वीच भावी नवरदेवाची आत्महत्या
सासरच्या छळाला कंटाळून २३ वर्षीय विवाहितेची आत्महत्या! हुंड्यासाठी छळ अन् विहिरीत उडी घेऊन शेवट
Pune Crime News | Bharti Vidyapeeth Police

पुणे : कात्रज परिसरात सासरच्या सततच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सासरा व दिराविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 11 एप्रिल रोजी रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास घडली. संबंधित महिलेने घरातच अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले. घटनेनंतर तिला गंभीर भाजलेल्या अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.

COMMENTS