Homeताज्या बातम्या

‘वृद्धेश्वर’ची निवडणूक बिनविरोध की रंगतदार लढत?; राजळे घराण्याच्या वर्चस्वाकडे लक्ष

पाथर्डी : वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आजचा गुरुवार (ता. १८) शेवटचा दिवस असून, दरवेळेस प्रमाणे ही

शरणपूर वृद्धाश्रमात मिष्टान्न भोजन; दिवंगत आई-वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पिठाची गिरणी भेट
मंदिरात दर्शनासाठी आलेल्यांवर जीवघेणा हल्ला; एक गंभीर, जामखेडमधील बटेवाडी परिसरातील धक्कादायक घटना
हसनापूर परिसरातील पाणंद रस्त्यांचे मुरमीकरण करावे  शिवसेना नेत्या हर्षदा काकडे यांचे तहसीलदारांना निवेदन
अहिल्यानगर : वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक बिनविरोध करण्याची तयारी  - ChiniMandi

पाथर्डी : वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आजचा गुरुवार (ता. १८) शेवटचा दिवस असून, दरवेळेस प्रमाणे ही निवडणूक बिनविरोध होणार की काही जागांसाठी लढत होणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. कारखाना स्थापनेनंतर काही अपवाद वगळता या कारखान्यावर राजळे घराण्याचेच वर्चस्व राहिले आहे.

तालुक्याचे राजकारण प्रामुख्याने राजळे घराणे, माजी आमदार चंद्रशेखर घुले व राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे नेते प्रताप ढाकणे यांच्याभोवती फिरत असले, तरीही हे तिघेही एकमेकांच्या साखर कारखान्याच्या निवडणुकीत फारसे लक्ष घालत नाहीत. त्यामुळे तिघांच्याही कारखान्यांच्या निवडणुका या बिनविरोध पार पडत असल्याचा आजवरचा इतिहास आहे.

वृद्धेश्वर कारखान्यात एकूण १९ संचालकांना निवडून द्यायचे असून, आजतागायात १९ जागांसाठी ४१ उमेदवारांचे ४४ उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. कारखान्याचे एकूण मतदान ८ हजार ७०८ आहे. ज्या ४१ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, त्यातील बहुतेक अर्ज हे राजळे समर्थकांचेच आहेत. त्यामुळे राजळे या वेळी कोणत्या जुन्या संचालकांना पुन्हा संधी देतात आणि कोणाचा पत्ता कट करतात, याकडे विद्यमान संचालकांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे नेते शिवशंकर राजळे यांनी या वेळी आपण निवडणूक लढवणार असे जाहीर केले आहे. त्यामुळे या वेळी ते खरोखरच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की ऐनवेळी माघार घेणार, हे आज स्पष्ट होणार आहे.

ज्या ४१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, त्यातील जवळपास ३७ उमेदवार हे राजळे यांच्या मर्जीतील आहेत, तर इतर चार उमेदवार हे राजळे विरोधी गटाचे आहेत. या चार उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले नाहीत, तर चार जागांसाठी कदाचित निवडणूक होऊ शकते; मात्र या चारही उमेदवारांना राजळे यांनी उमेदवारी अर्ज माघार घ्यायला लावल्यास ही निवडणूक नेहमीप्रमाणे बिनविरोध होऊ शकते.

COMMENTS