Homeताज्या बातम्या

मंदिरात दर्शनासाठी आलेल्यांवर जीवघेणा हल्ला; एक गंभीर, जामखेडमधील बटेवाडी परिसरातील धक्कादायक घटना

जामखेड : देवदर्शनासाठी मंदिरात आलेल्या दोघांवर किरकोळ कारणावरून जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना जामखेड तालुक्यातील बटेवाडी शिवारातील मारुती

श्रीगोंद्यात दुर्दैवी; शेतात ट्रॅक्टर घेऊन गेलेल्या २२ वर्षीय तरुण इंजिनिअरिंग विद्यार्थ्याचा वीज कोसळून मृत्यू
शरणपूर वृद्धाश्रमात मिष्टान्न भोजन; दिवंगत आई-वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पिठाची गिरणी भेट
योग हा संतुलित जीवनाचा सर्वोत्तम मार्ग; कोपरगावमध्ये १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
नारळ फोडण्याचा दगड डोक्यात घालून जीवे मारण्याचा प्रयत्न; आरोपीविरुद्ध  गुन्हा दाखल. - Hello Ahilyanagar

जामखेड : देवदर्शनासाठी मंदिरात आलेल्या दोघांवर किरकोळ कारणावरून जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना जामखेड तालुक्यातील बटेवाडी शिवारातील मारुती मंदिर परिसरात घडली. या हल्ल्यात मुकुंद रघुनाथ पोकळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. त्यांना वाचविण्यासाठी धावलेल्या शिवाजी मधुकर मोरे यांनाही मारहाण करून जखमी करण्यात आले.

याप्रकरणी शिवाजी मधुकर मोरे (वय ५३, रा. पोकळेवस्ती, जामखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाळू ऊर्फ दीपक मनोहर खरात (रा. बटेवाडी, ता. जामखेड) याच्याविरुद्ध जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, मोरे आणि मुकुंद पोकळे हे सोमवारी (दि. १५) दुपारी देवदैठण येथे देवदर्शन करून परतत असताना बटेवाडी शिवारातील मारुती मंदिरात दर्शनासाठी थांबले. मंदिरासमोर मोटारसायकल उभी केल्यानंतर ते दर्शनासाठी जात असताना तेथे उभ्या असलेल्या मद्यधुंद अवस्थेतील आरोपीने ‘येथे मोटारसायकल का लावली, तुम्ही मंदिरात जायचे नाही,’ असे म्हणत मोटारसायकलीची चावी काढून घेतली व मोटारसायकल खाली पाडली.

या प्रकारात मुकुंद पोकळे खाली पडले. त्यांना उठविण्याचा प्रयत्न सुरू असताना आरोपीने मंदिरासमोरील नारळ फोडण्याचा दगड त्यांच्या डोक्यात घातल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. गंभीर दुखापत होऊन पोकळे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना मदत करण्यासाठी गेलेल्या शिवाजी मोरे यांच्या डोक्यात, खांद्यावर व पायावरही त्याच दगडाने वार करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

मुकुंद पोकळे यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ते अद्याप बेशुद्ध असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. झटापटीदरम्यान मुकुंद पोकळे यांचा भ्रमणध्वनीही (मोबाईल) हरविल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच, पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे करीत आहेत.

COMMENTS