घोडेगाव : कै. बक्षु ठोंबरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भाऊसाहेब ठोंबरे व संगीता ठोंबरे यांनी फत्तेपूर येथील शरणपूर वृद्धाश्रमातील ज्येष्ठ ना

घोडेगाव : कै. बक्षु ठोंबरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भाऊसाहेब ठोंबरे व संगीता ठोंबरे यांनी फत्तेपूर येथील शरणपूर वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना मिष्टान्न भोजन दिले. यावेळी ठोंबरे कुटुंबीयांसह रमेश जाधव, शिवाजी ईखे, प्रदीप काळे, कैलास शिंदे, भाऊसाहेब काळे व दिलीप शिंदे उपस्थित होते.
वृद्धाश्रमाच्या गरजा लक्षात घेऊन दिलीप शिंदे यांनी आपल्या दिवंगत आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृद्धाश्रमाला पिठाची गिरणी भेट दिली. या उपक्रमाचे उपस्थितांनी मनापासून स्वागत केले. अक्षय ग्रामीण युवा क्रीडा व सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून शरणपूर वृद्धाश्रमाचे संचालन करण्यात येत असून, अध्यक्ष रावसाहेब मगर यांच्या मार्गदर्शनाखाली हा समाजोपयोगी उपक्रम सुरू आहे.
रस्त्याच्या दुरूस्तीसाठी मदतीचे आवाहन या वृद्धाश्रमासाठी एक एकर जागा उपलब्ध असून, त्याठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी भाजीपाला पिकविण्यात येतो. मात्र, सद्यस्थितीत वृद्धाश्रमाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होत असल्याने वाहने आतपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे रस्त्याचे मुरुमीकरण व खडीकरण करण्यासाठी दानशूर व्यक्तींनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन वृद्धाश्रमाच्या वतीने करण्यात आले आहे.
आपल्या प्रिय व्यक्तींच्या स्मृतिप्रीत्यर्थ नागरिकांनी वृद्धाश्रमाला आवर्जून भेट द्यावी, येथील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधावा आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष रावसाहेब मगर यांनी केले.
याप्रसंगी वृद्धाश्रमाच्या वतीने भाऊसाहेब ठोंबरे कुटुंबीयांचा शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. बाळासाहेब मुटकुळे यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न झाला. कार्यक्रमाच्या शेवटी रावसाहेब मगर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

COMMENTS