कर्जत : मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने रिट याचिका क्रमांक ८२५५/२०२५ मध्ये १७ जुलै २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार श्री गोदड महाराज ट्रस्टकडे मंदिर व यात्रा व्यवस्थापनाचे सर्व अधिकार कायम असल्याची माहिती ट्रस्टचे सचिव तथा अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य शशिकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप पाटील, उपाध्यक्ष प्रवीण घुले पाटील, खजिनदार बिभीषण खोसे पाटील तसेच विश्वस्त तानाजी पाटील, रमेश पाटील आणि विश्वजीत पाटील उपस्थित होते.ट्रस्टने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने श्री गोदड महाराज ट्रस्टला रथोत्सव आयोजित करण्यास परवानगी दिली आहे. तसेच सहाय्यक धर्मादाय आयुक्त, अहिल्यानगर यांनी ट्रस्टच्या अधिपत्याखाली पारंपरिक सेवेकरी व मानकऱ्यांना सोबत घेऊन रथोत्सव आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.निवेदनानुसार, श्री गोदड महाराज ट्रस्ट हा सन १९६५ पासून नोंदणीकृत सार्वजनिक विश्वस्त असून सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी ट्रस्टची योजना मंजूर केली आहे. न्यायालयानेही या मंजूर योजनेला कोणतीही स्थगिती नसल्याचे नमूद करत पारंपरिक सेवेकऱ्यांना त्यांच्या सेवेसाठी संधी देण्याचे निर्देश दिले आहेत.ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, न्यायालयाने “संत सद्गुरू अमरसिंह महाराज” आणि “गोदड महाराज” हे एकच व्यक्तिमत्त्व असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. तसेच नोंदणीकृत ट्रस्ट अस्तित्वात असताना त्याच देवस्थानाच्या नावाने स्वतंत्र समिती स्थापन करून निधी संकलन करणे किंवा स्वतंत्र यात्रा व उत्सव आयोजित करणे योग्य नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.ट्रस्टने आवाहन केले आहे की, २८ जुलै २०२६ पासून कोणत्याही व्यक्तीने किंवा संस्थेने गोदड महाराज यांच्या नावाने वर्गणी, देणगी अथवा निधी गोळा करू नये. तसेच स्वतंत्र यात्रा किंवा उत्सव आयोजित करू नयेत. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही ट्रस्टच्या वतीने देण्यात आला आहे.

COMMENTS