Homeताज्या बातम्या

कर्जमुक्ती योजनेचे आधार प्रमाणीकरण रखडलेसेतू केंद्रांची प्रणाली सुरू करण्याची ग्राहक पंचायतचे मागणी

    अकोले : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया अकोले तालुक्यात ठप्प झाली असून, शासकीय सुविधा केंद्र (सेतू) व आपले सरकार सेवा केंद्रांवरील संगणकीय प्रणाली कार्यान्वित करण्याची मागणी ग्राहक पंचायतने निवासी नायब तहसीलदार किसन लोहरे यांच्याकडे केली आहे.यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ची अंमलबजावणी सुरू केली असून, पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी महा-आयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी बँक खात्याचे आधारशी प्रमाणीकरण (आधार लिंकिंग) करणे आवश्यक आहे.मात्र, अकोले तालुक्यातील शासकीय सुविधा केंद्रे व आपले सरकार सेवा केंद्रांवरील प्रणाली सतत बंद असल्याने लाभार्थी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करता येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी लाभार्थी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारू नये, असे आदेश सर्व सेतू केंद्र चालकांना दिले आहेत. त्यानंतरच केंद्रांवरील सेवा बंद असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, शासनाच्या निर्देशांमुळेच ही सेवा बंद ठेवण्यात आली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी तसेच आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरळीत सुरू होण्यासाठी शासकीय सुविधा केंद्रे व आपले सरकार सेवा केंद्रांवरील संगणकीय प्रणाली तातडीने कार्यान्वित करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनावर ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, सचिन राम रुद्रे, अध्यक्ष दत्ता शेनकर, विठ्ठल उघडे, लक्ष्मण मेंगाळ, कैलास तळेकर, बबन तिकांडे, अरुण शेळके, अनंत घाणे, गंगाराम धिंदळे, सुरेश गभाले, रामदास पवार, ज्ञानेश्वर पुंडे, भाऊसाहेब वाकचौरे, दत्तात्रय मुठे, अशोक उघडे, गणपत थिगळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

नांदेड विभागातील विशेष तिकीट तपासणी मोहिमेत ५४३ प्रकरणे निष्पन्न; ३.८१ लाखांचा महसूल वसूल
तैवानचा प्रश्न अमेरिका का उकरतेय!
निपमची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६: पात्र  लाभार्थ्यांच्या याद्या लवकरच प्रसिद्ध होणार! आधार प्रमाणीकरणाचे आवाहन ...

COMMENTS