Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विजय हराळे म्हणजे कार्यालयाचा कणा : शशिकांत देशमुख

जामखेड : कोणताही अधिकारी कर्मचारी निवृत्त होतांना त्यांच्या कामांच्या पध्दतीने व वागण्या बोलण्याच्या स्वभावाने कायम लक्षात राहतात. काहीचे काम कायम मार्गदर्शक ठरते. विजय हराळे हे लिपिक म्हणून काम करत होते मात्र ते खऱ्या अर्थाने कार्यालयाचा कणा होते असे प्रतिपादन दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव शशिकांत देशमुख यांनी व्यक्त केले. दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या साकेश्वर विद्यालयातील लिपीक विजय हराळे यांच्या सेवापुर्ती कृतज्ञता सोहळ्यात शशिकांत देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव अरुण चिंतामणी तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सचिव शशिकांत देशमुख, माजी प्राचार्य श्रीकांत होशिंग, अनंता खेत्रे, श्रीराम मुरूमकर, रमेश अडसूळ, संजय वराट, डॉ. भगवानराव मुरूमकर, कैलास वराट, ज्ञानाभाऊ मुरूमकर, हरीभाऊ बेलेकर, शिवप्रसाद झगडे, संजय गदादे, आंबेकर भाऊसाहेब, ईश्वर कोळी, दत्तात्रय राजमाने, सरपंच कांतीलाल वराट, महादेव मुरूमकर, रोहित घोडेस्वार, माधव हराळे, राजेंद्र हराळे, रमेश गिरमे, रघुनाथ हराळे, आजीनाथ निमोणकर, दशरथ निमोणकर, रामचंद्र भाऊसाहेब, बबन राठोड, पोपट जगदाळे, बाबासाहेब धनवडे, संतोष देशमुख, किशोर कुलकर्णी, अशोक घोलप, साकेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत लहाने, शिक्षक सुदाम वराट, अर्जुन रासकर, त्रिंबक लोळगे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भरत लहाने यांनी केले. माजी प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी विजय हराळे यांच्या शिस्तप्रिय कामाची, प्रामाणिकपणाची आणि कार्यालयातील योगदानाची प्रशंसा केली. यावेळी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने वतीने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. श्री साकेश्वर विद्यालयाच्या वतीने हराळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदाम वराट व अर्जुन रासकर यांनी तर तर आभार त्रिंबक लोळगे यांनी मानले.

जामखेड तालुक्यात कर्ज वसुली ५१.४३ टक्के; ठेवींमध्येही विक्रम; जिल्हा बँकेची प्रगतशील कामगिरी
महात्मा बसवेश्वर समाज परिवर्तनाचे महान विचारवंत : सरडे
मंत्री भुजबळ यांचे सभापती राम शिंदेंकडून स्वागत  

जामखेड : कोणताही अधिकारी कर्मचारी निवृत्त होतांना त्यांच्या कामांच्या पध्दतीने व वागण्या बोलण्याच्या स्वभावाने कायम लक्षात राहतात. काहीचे काम कायम मार्गदर्शक ठरते. विजय हराळे हे लिपिक म्हणून काम करत होते मात्र ते खऱ्या अर्थाने कार्यालयाचा कणा होते असे प्रतिपादन दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव शशिकांत देशमुख यांनी व्यक्त केले. दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या साकेश्वर विद्यालयातील लिपीक विजय हराळे यांच्या सेवापुर्ती कृतज्ञता सोहळ्यात शशिकांत देशमुख बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव अरुण चिंतामणी तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सचिव शशिकांत देशमुख, माजी प्राचार्य श्रीकांत होशिंग, अनंता खेत्रे, श्रीराम मुरूमकर, रमेश अडसूळ, संजय वराट, डॉ. भगवानराव मुरूमकर, कैलास वराट, ज्ञानाभाऊ मुरूमकर, हरीभाऊ बेलेकर, शिवप्रसाद झगडे, संजय गदादे, आंबेकर भाऊसाहेब, ईश्वर कोळी, दत्तात्रय राजमाने, सरपंच कांतीलाल वराट, महादेव मुरूमकर, रोहित घोडेस्वार, माधव हराळे, राजेंद्र हराळे, रमेश गिरमे, रघुनाथ हराळे, आजीनाथ निमोणकर, दशरथ निमोणकर, रामचंद्र भाऊसाहेब, बबन राठोड, पोपट जगदाळे, बाबासाहेब धनवडे, संतोष देशमुख, किशोर कुलकर्णी, अशोक घोलप, साकेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत लहाने, शिक्षक सुदाम वराट, अर्जुन रासकर, त्रिंबक लोळगे आदि उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भरत लहाने यांनी केले. माजी प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी विजय हराळे यांच्या शिस्तप्रिय कामाची, प्रामाणिकपणाची आणि कार्यालयातील योगदानाची प्रशंसा केली. यावेळी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने वतीने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. श्री साकेश्वर विद्यालयाच्या वतीने हराळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदाम वराट व अर्जुन रासकर यांनी तर तर आभार त्रिंबक लोळगे यांनी मानले.

COMMENTS